Home /News /sport /

IND vs SA : व्यंकटेश अय्यरनं बॉलिंग न करण्याचं कारण झालं उघड

IND vs SA : व्यंकटेश अय्यरनं बॉलिंग न करण्याचं कारण झालं उघड

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या वन-डे मालिकेची सुरूवात टीम इंडियासाठी निराशाजनक झाली आहे. या सामन्यात कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) घेतलेल्या एका निर्णयाची चांगलीच चर्चा झाली.

    मुंबई, 20 जानेवारी :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या वन-डे मालिकेची सुरूवात टीम इंडियासाठी निराशाजनक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 31 रननं पराभव केला. दोन टेस्ट गमावल्यानंतर वन-डे मालिकेत भारतीय टीम पुनरागमन करेल अशी सर्वांना आशा होती. पण, तसे झाले नाही. या सामन्यात कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) घेतलेल्या एका निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. राहुलनं पहिल्यांदाच वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी केली. या मन्यात व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) ऑल राऊंडर म्हणून संधी देण्यात आली होती. पण पहिल्या वनडेमध्ये भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल अपयशी ठरत असतानाही राहुलने व्यंकटेश अय्यरकडे बॉल दिला नाही. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. निवड समिती आणि टीम प्रशासन व्यंकटेश अय्यरकडे हार्दिकला पर्याय म्हणून बघत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजवेळीही कर्णधार रोहित शर्माने आम्ही व्यंकटेशकडे ऑलराऊंडर म्हणूनच बघत आहोत, असं सांगितलं. पण तरीही व्यंकटेश अय्यरला बॉलिंग का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे उत्तर सामना संपल्यानंतर शिखर धवननं दिलं आहे. धवननं सांगितलं की, 'पिचवर चांगला टर्न असल्यानंच व्यंकेटश अय्यरला बॉलिंग दिली नाही. या पिचवर स्पिनर्स चांगली कामगिरी करत होते. त्यामुळे मधल्या ओव्हर्समध्ये फास्ट बॉलर्सचा जास्त वापर झाला नाही, स्पिनर्सनीच बॉलिंग केली.' कपिल शर्मानं गर्लफ्रेंड बाबत विचारताच पृथ्वीनं दिलं 'हे' उत्तर, पाहा VIDEO या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 17.4 ओव्हरमध्ये आफ्रिकेने 67 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण टेम्बा बऊमा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांच्या शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेला 50 ओव्हरमध्ये 4 आऊट 296 पर्यंत मजल आली. रस्सी व्हॅन डर डुसेनने 96 बॉलमध्ये नाबाद 129 रन केले, यात 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर टेम्बा बऊमाने 143 बॉलमध्ये 110 रन केले. बऊमाने 8 फोर लगावले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या