• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: हरभजन-आमिरमध्ये रंगले Twitter War, भज्जीनं करुन दिली स्पॉटफिक्सिंगची आठवण

India vs Pakistan: हरभजन-आमिरमध्ये रंगले Twitter War, भज्जीनं करुन दिली स्पॉटफिक्सिंगची आठवण

टीम इंडियाला वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदाच पराभूत केल्यानं (India vs Pakistan) पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या आनंदात ते सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच होऊन आता तीन दिवस उलटली आहेत. पाकिस्ताननं वर्ल्ड कपमधील 29 वर्षांची पराभवाची परंपरा यंदा तोडली. या विजयानंतर पाकिस्तानचे फॅन्स तसंच माजी खेळाडूंमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. या आनंदात टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना डिवचण्याची संधी ते सोडत नाहीत. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) त्यांचे विशेष टार्गेट आहे. शोएब अख्तरपाठोपाठ मोहम्मद आमिरनं (Mohammad Amir) याने हरभजनला ट्विटरवर टार्गेट केले. त्याला हरभजननंही उत्तर दिलं. दोन्ही खेळाडूंमध्ये रात्रभर वाद सुरू होता. यामध्ये त्यांनी सभ्य भाषेची मर्यादी देखील ओलांडली. मोहम्मद आमिरनं सुरुवातीला शाहीद आफ्रिदीनं हरभजनला टेस्ट क्रिकेटमध्ये सलग चार सिक्स मारल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आणि टेस्टमध्ये असे कसे होऊ शकते? असा प्रश्न विचारला. त्यानंतर हरभजननं लॉर्डसवरील नो बॉलची आठवण आमिरला करुन दिली. लॉर्डसवर नो बॉल कसा झाला? किती पैसे दिले कुणी घेतले? टेस्ट क्रिकेटमध्ये नो बॉल कसा होऊ शकतो? या सुंदर खेळाला बदनाम केल्याबद्दल तुला आणि तुझ्या समर्थकांना लाज वाटायला हवी, असं उत्तर हरभजननं दिलं. हरभजनच्या या ट्विटला उत्तर देताना आमिरनं घाणेरडी भाषा वापरली. त्यानंतर भज्जीनं टीम इंडियाला विजयासाठी 3 बॉलमध्ये 6 रन हवे होते तेव्हा आमिरला सिक्स मारल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आणि इथून निघून जा असा सल्ला दिला. आमिरनं त्यानंतर आणखी एक ट्विट करत तीन दिवसांपूर्वीच आम्ही भारताला हरवलंय आणि यंदा आम्हाला वर्ल्ड कप जिंकताना पाहा. तुला वॉक ओव्हर तर मिळणार नाही, पार्कमध्ये फिरायला जा, अशी उद्दाम भाषा वापरली. मोहम्मद आमिरनं इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्स टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. त्यामध्ये त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. T20 World Cup: 2 विजयानंतर बिथरले पाकिस्तानी फॅन्स, न्यूझीलंडविरुद्ध केली हुल्लडबाजी VIDEO
  Published by:News18 Desk
  First published: