• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs PAK 2022: ... तर भारत-पाकिस्तान मॅचसाठी करावी लागणार नाही वर्ल्ड कपची प्रतीक्षा

IND vs PAK 2022: ... तर भारत-पाकिस्तान मॅचसाठी करावी लागणार नाही वर्ल्ड कपची प्रतीक्षा

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक मॅचची क्रिकेट फॅन्सना मोठी उत्सुकता असते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी दोन्ही देशात क्रिकेट नियमित होण्याचे संकेत दिले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक मॅचची क्रिकेट फॅन्सना मोठी उत्सुकता असते. टी20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल दोन वर्षांनी दोन्ही देश एकमेकांच्या समोर आले होते. या मॅचमध्ये प्रेक्षकांच्या संख्येचा मोठा रेकॉर्ड झाला. प्रेक्षकांची मोठी मागणी असूनही दोन्ही देशांमधील तणावामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी दोन्ही देशात क्रिकेट नियमित होण्याचे संकेत दिले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात भविष्यात द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता कमी आहे. पण दोन्ही देश एखाद्या तिरंगी मालिकेत एकमेकांच्या विरुद्ध उतरू शकतात, असं मत राजा यांनी व्यक्त केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं यजमानपद आयसीसीनं पाकिस्तानला सोपवलं आहे. टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार का? असा प्रश्न राजा यांना विचारल्यात आला होता. त्यावर, 'कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून बाहेर पडणे सोपे नाही. एखाद्या देशाला यजमानपद देण्याचा निर्णय पूर्ण विचार करून दिला जातो. माझ्यामते भारत स्पर्धेतून माघार घेणार नाही,' असं राजा यांनी सांगितले. माझे आणि सौरव गांगुलीचे प्रशासकीय पातळीवर चांगले संबंध आणि संपर्क आहे. दोन क्रिकेटपटू जेव्हा प्रशासन चालवत असतात त्यावेळी ते क्रिकेटच्या विषयावर जास्त लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे काम आणखी सोपे होते, असे राजा यांनी सांगितले. 2023 मधील वन-डे वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असून त्यासाठी पाकिस्तानच्या टीमला भारतामध्ये यावं लागणार आहे. यापूर्वी 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम भारतामध्ये आली होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन Tim Paine नं दिला राजीनामा, अश्लील मेसेज पाठवल्यानं सोडली कॅप्टनसी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan 2022) यांच्यात द्विपक्षीय सीरिज होत नसल्यानं दोन्ही देशांमधील लढती कमी होत आहेत. पुढील वर्षी श्रीलंकेत टी20 आशिया कप आणि ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यावेळी या दोन्ही देशांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: