Home /News /sport /

IND vs NZ: रणजीमध्ये ट्रिपल सेंच्युरी, IPL मध्ये शेवटच्या बॉलवर SIX, मुंबई टेस्ट गाजवण्यासाठी भारतीय सज्ज

IND vs NZ: रणजीमध्ये ट्रिपल सेंच्युरी, IPL मध्ये शेवटच्या बॉलवर SIX, मुंबई टेस्ट गाजवण्यासाठी भारतीय सज्ज

श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकावत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. आता मुंबईत होणाऱ्या या सीरिजमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये आणखी एक खेळाडू पदार्पणासाठी सज्ज आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand ) यांच्यात कानपूरमध्ये झालेल्या टेस्टमध्ये श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) पदार्पण केले. श्रेयसनं पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. आता मुंबईत होणाऱ्या या सीरिजमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये आणखी एक खेळाडू पदार्पणासाठी सज्ज आहे. या भारतीयानं देखील देशांतर्गत क्रिकेट चांगलंच गाजवलं आहे. रणजी आणि T20 या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यानं कमाल केली असून रणजी क्रिकेटमध्ये तर त्याच्या नावावर ट्रिपल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड आहे. रणजी क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी करणाऱ्या या खेळाडूवर कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) देखील मोठा विश्वास आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2021) विराटनं त्याला सातत्यानं संधी दिली. त्यानं देखील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत आरसीबीला (RCB) विजय मिळवून दिला होता. विराटनं दिलेल्या संधीचं सोनं करणाऱ्या या खेळाडूचं नाव आह, कोना श्रीकर भरत (KS Bharat). ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) दुखापतीमुळे खेळणे अशक्य असल्यानं त्याच्या जागी भरत मुंबई टेस्टमध्ये खेळण्याची दाट शक्यता आहे. पदार्पणापूर्वीच कमाल ऋद्धीमान साहाची मान कानपूर टेस्टमध्ये दुखावली होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये भरतला विकेट किपिंग करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. फक्त 12 मिनिटे आधाी त्याला याची सूचना देण्यात आली होती. भरतनं कानपूर टेस्टमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये विल यंगचा कॅच घेतला. यावेळी सुरुवातीला अंपायरनं यंग नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला होता. पण, भरतला तो आऊट असल्याची खात्री होती. कॅप्टन अजिंक्य रहाणेनं त्याचा सल्ला मानला आणि टीम इंडियाला पहिली विकेट मिळली. भरतनं कॅच घेण्यापूर्वी विल यंग आणि टॉम लॅथम या जोडीनं 151 रनची पार्टनरशिप केली होती. भरत पहिल्या इनिंगमध्ये फक्त यंगची कॅच घेऊन थांबला नाही. त्यानं सुरुवातीला अनुभवी रॉस टेलरचा कॅच पकडला. त्यानंतर शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या टॉम लॅथमचे स्टंपिंग केले. IND vs NZ: पदार्पणापूर्वीच भरतची कमाल, पण त्याच्या नावावर होणार का रेकॉर्डची नोंद? वाचा सविस्तर पहिला भारतीय भरतनं कानपूर टेस्टमध्ये केलेल्या कामगिरीचं श्रेय त्याच्या रणजी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये आहे. विशाखापट्टणममध्ये जन्म झालेला भरत सध्या 28 वर्षांचा आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. त्यानं 2014-15 च्या सिझनमध्ये गोव्या विरुद्ध खेळताना 308 रनची ऐतिहासिक खेळी केली होती. रणजी क्रिकेटच्या इतिहासात ट्रिपल सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय विकेट किपर-बॅटर आहे. भरतनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आजवर 78 मॅच खेळल्या असून त्यामध्ये त्यानं 37.24 च्या सरासरीनं 4283 रन केले आहेत. यामध्ये 9 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. विकेटकिपर म्हणूनही त्याची कामगिरी दमदार असून त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तब्बल 270 कॅच घेतल्या आहेत. तसंच 31 स्टंपिंग केले आहेत. लिस्ट A क्रिकेटमध्ये भरतच्या नावावर 3 शतक आणि 5 अर्धशतकांसह 1351 रनची नोंद आहे. तसंच 54 कॅच आणि 11 स्टंपिंग देखील आहेत. तर T20 क्रिकेटमध्ये भरतनं 5 अर्धशतकांसह 1050 रन केले आहेत. तसेच 47 कॅच आणि 11 स्टंपिगची नोंद त्याच्या नावावर आहे. IND vs NZ: न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियात होणार 3 बदल, पाहा कशी असेल Playing11 भरत हा ओपनिंग बॅटर आहे. त्यानं गोव्या विरुद्धची ऐतिहासिक ट्रिपल सेंच्युरी ही ओपनर म्हणून झळकावली होती. त्यामुळे मुंबई टेस्टमध्ये भरत शुभमन गिलसह ओपनिंगला येण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Team india

    पुढील बातम्या