Home /News /sport /

IND vs NZ: टीम इंडियाच्या पराभवानंतर व्यंकटेश अय्यर पडला होता आजारी, वडिलांनी केला खुलासा

IND vs NZ: टीम इंडियाच्या पराभवानंतर व्यंकटेश अय्यर पडला होता आजारी, वडिलांनी केला खुलासा

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून (IPL 2021) पुढे आलेल्या व्यंकटेश अय्यरकडं (Venkatesh Iyer) हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर: यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून (IPL 2021) पुढे आलेल्या व्यंकटेश अय्यरकडं (Venkatesh Iyer) हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी20 सीरिजसाठी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अय्यरनं आयपीएल स्पर्धेत 4 अर्धशतकासह 370 रन काढले आणि 3 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंड सीरिजसाठी अय्यरची निवड झाल्यानंतर त्याचे वडील राजशेखरन अय्यर यांनी एक खुलासा केला आहे. लहानपणी भारताचा पराभव पाहिल्यानंतर अय्यर आजारी पडल्याची आठवण त्यांनी सांगितली आहे. अय्यर लहाणपणापासूनच सौरव गांगुलीचा फॅन आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एका मॅचमध्ये गांगुलीनं जास्त रन काढले नव्हते. त्यानंतर भारताचा पराभव झाला. भारताचा हा पराभव पाहून अय्यर आजारी पडला होता. पीटीआय भाषाशी बोलताना अय्यरच्या वडिलांनी सांगितले की, 6-7 वर्षांपासून त्यांचा मुलाला क्रिकेटची गोडी निर्माण झाली होता. तसंच तो पहिल्यापासूनच गांगुलीचा फॅन आहे. टीम इंडियाच्या माजी कॅप्टनपासून प्रेरणा घेत अय्यरनं डाव्या हातानं बॅटींग सुरू केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये गांगुली जास्त रन करू शकला नाही. तसंच टीम इंडियाचा पराभव झाला. त्यामुळे अय्यर अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्याला तापही आला, अशी आठवण त्याच्या वडिलांनी सांगितली आहे. अभ्यासाशी तडजोड नाही आयपीएलदरम्यान व्यंकटेश अय्यरने आपण क्रिकेटमध्ये करियर केलं नसतं तर आयआयटी किंवा आयआयएममध्ये असतो, असं सांगितलं होतं. 'मी हुशार विद्यार्थी होतो. दक्षिण भारतातल्या कुटुंबामध्ये खेळ हा दुसरा पर्याय असतो. आई-वडील मुलांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. माझ्याकडे आईने मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं,' असं अय्यर म्हणाला. मध्य प्रदेशकडून ओपनिंग करणाऱ्या 26 वर्षांच्या व्यंकटेशने इतर मुलांप्रमाणेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकइन्फोशी बोलताना व्यंकटेश म्हणाला, 'मी घरामध्ये पुस्तकांमध्येच असायचो, तेव्हा आई मला बाहेर खेळायला पाठवायची'. ENG vs NZ: सेमी फायनलमध्ये धोनीची चर्चा, 'या' घटनेमुळे आठवला माही सीए आणि बीकॉम डिग्री मिळवण्यासाठी अय्यरने एडमिशनही घेतली होती. 2016 साली त्याने इंटरमीडिएट परीक्षेमध्येही टॉप केलं होतं. त्यावेळी अय्यरकडे क्रिकेट किंवा सीए यापैकी एकच पर्याय होता. सीए फायनल परीक्षा देणं म्हणजे क्रिकेट सोडणं किंवा काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेणं, पण त्याने क्रिकेट निवडलं. 'क्रिकेट आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं मला फार कठीण गेलं नाही. मी कायमच हुशार विद्यार्थी होतो. मी क्रिकेटपटू नसतो तर आयआयटी किंवा आयआयएमध्ये असतो. 2018 साली मला बँगलोरमध्ये नोकरीही मिळाली होती, पण क्रिकेटसाठी मी ती नोकरी सोडली,' असं अय्यरनं सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Team india

    पुढील बातम्या