• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ Test Series: 'अश्विन-अक्षरसाठी प्लॅन तयार', न्यूझीलंडच्या खेळाडूनं दिला इशारा

IND vs NZ Test Series: 'अश्विन-अक्षरसाठी प्लॅन तयार', न्यूझीलंडच्या खेळाडूनं दिला इशारा

टीम इंडिया विरुद्धची टी20 मालिका पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड टीमचं (India vs New Zealand) आता कसोटी मालिकेवर लक्ष आहे. दोन्ही देश यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) आमने-सामने आले होते.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर: टीम इंडिया विरुद्धची टी20 मालिका पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड टीमचं (India vs New Zealand) आता कसोटी मालिकेवर लक्ष आहे. दोन्ही देश यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) आमने-सामने आले होते. त्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. यंदाची मालिका देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. या मालिकेत न्यूझीलंडसमोर भारतीय स्पिनर्सचं आव्हान असेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिली टेस्ट 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. या टेस्टमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तयार असल्याचा विश्वास न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) यानं दिला आहे. 'हे निश्चितच एक आव्हान असेल. मी त्यासाठी तयार आहे. भारताविरुद्ध किंवा ऑस्ट्रेलियात खेळण्यासारखे विदेशी टीमला कोणते अवघड आव्हान नाही. ही कदाचित टेस्ट क्रिकेटमधील दोन मोठी आव्हानं आहेत. पण, आम्ही तयार आहोत. आम्ही अंडरडॉग असून चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.' टेलर पुढे म्हणाला की, 'तुम्ही जगातील नंबर 1 टीम असला तरी भारताविरुद्ध भारतामध्ये खेळताना नेहमीच अंडरडॉग असता. अश्विन आणि अक्षर पटेल या जोडीचा सामना करणे ही न्यूझीलंडसाठी या मालिकेत सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल. मी त्यांच्याविरुद्ध तयार केलेल्या रणनितीबाबत सांगणार नाही. टीम इंडियानं कोणत्या खेळाडूंना उतरवण्याचं ठरवलं आहे, याबाबत मला माहिती नाही. अक्षर पटेलनं इंग्लंड विरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते तीन किंवा दोन स्पिनर्ससह खेळतील. अश्विन त्यापैकी एक असेल. तो एक चांगला बॉलर आहे. विशेषत: या परिस्थितीमध्ये त्याला आम्ही कसं खेळू यावर या मालिकेचं भवितव्य निश्चित होणार आहे.' असे टेलरने सांगितले. वेस्ट इंडिजच्या खेळाडूला गंभीर दुखापत, स्ट्रेचरने नेलं मैदानाच्या बाहेर, LIVE VIDEO टेलरनं यावेळी न्यूझीलंडच्या बॅटर्सना टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सपासूनही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 'नवा बॉल आणि रिव्हर्स स्विंगमध्ये नेहमीच फास्ट बॉलिंग महत्त्वाची असते. पण, इथं स्पिनर्सची नेहमी मोठी भूमिका बजावतात. पण त्यामुळे आपण फक्त स्पिनर्सलाच महत्त्व दिलं. तर त्याचा फटका बसू शकतो.' असा इशारा टेलरनं दिला.
  Published by:News18 Desk
  First published: