• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: कॅप्टन रोहित आणि कोच द्रविडची पहिली भेट कधी झाली? दोघांनी सांगितला 'तो' किस्सा VIDEO

IND vs NZ: कॅप्टन रोहित आणि कोच द्रविडची पहिली भेट कधी झाली? दोघांनी सांगितला 'तो' किस्सा VIDEO

रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्णवेळ कॅप्टन आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर होणारी ही पहिलीच मालिका आहे.

 • Share this:
  जयपूर, 17 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी20 सीरिजला बुधवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिली मॅच बुधवारी होणार असून यामध्ये टीम इंडियात अनेक बदल दिसणार आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्णवेळ कॅप्टन आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर होणारी ही पहिलीच मालिका आहे. टी20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे अभियान समाप्त होताच विराट कोहलीनं (Virat Kohli) या प्रकरातील कॅप्टनसी सोडली आहे. तर त्याचबरोबर  मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) कार्यकाळ देखील समाप्त झाला आहे. रोहित शर्माची आज क्रिकेट विश्वातील आक्रमक बॅटर म्हणून ओळख आहे. पण, त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण फार कमी जणांना लक्षात आहे. रोहितनं 2007 साली राहुल द्रविडच्या कॅप्टनसीमध्येच पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. 23 जून 2007 रोजी आयर्लंड विरुद्ध झालेल्या वन-डे मॅचमध्ये रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. राहुल द्रविडनं मंगळवारी पत्रकारांशी बोलताना याबाबतची आठवण सांगितली. 'आम्ही टीम बसमध्ये याबाबत चर्चा करत होता. काळ किती लवकर पुढे गेला आहे. मी रोहितला त्यापूर्वीपासून ओळखत होतो. आम्ही मद्रासमध्ये चॅलेंजर स्पर्धा खेळली होती. रोहित किती खास आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आता इतक्या वर्षांनंतर त्याच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळेल याचा कधी विचार केला नव्हता. त्यानं भारतीय क्रिकेट टीम आणि मुंबई इंडियन्ससाठी जे योगदान दिलं आहे, ते नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे,' असं द्रविडनं स्पष्ट केलं. रोहितनंही याबाबतच्या आठवणी शेअर केल्या. 'माझी 2007 साली टीम इंडियात निवड झाली. त्यावेळी बंगळुरूत झालेल्या एका कॅम्पमध्ये मला द्रविडशी बोलण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. मी त्यावेळी खूप नर्व्हस होतो, त्यामूळे कमी बोललो. मी तेव्हा माझ्या वयाच्या लोकांशी देखील फार बोलत नव्हतो. द्रविडशी बोलणे तर दूरची गोष्ट होती. आयर्लंड विरुद्धच्या मॅचपूर्वी तू खेळणार असल्याचं द्रविडनं मला सांगितलं. माझं स्वप्न पूर्ण होण्याचा तो क्षण होता. त्यानंतर आमच्याच नेहमीच बोलणे होते.' असे रोहितने सांगितले. PAK vs BAN : पाकिस्तान टीमच्या कृतीनं बांगलादेशात संताप, सीरिज रद्द करण्याची मागणी
  Published by:News18 Desk
  First published: