Home /News /sport /

IND vs NZ: टीम इंडियामध्ये आला आणखी एक मुंबईकर, द्रविडनं दाखवला मोठा विश्वास

IND vs NZ: टीम इंडियामध्ये आला आणखी एक मुंबईकर, द्रविडनं दाखवला मोठा विश्वास

राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा हेड कोच झाल्यानंतर ही पहिलीच टेस्ट सीरिज (India vs New Zealand) आहे. या सीरिजसाठी द्रविडनं एका मुंबईकरवर मोठा विश्वास दाखवला आहे.

    मुंबई, 12 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजसाठी (India vs New Zealand Test Series) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. गेले काही महिने टीम इंडिया सातत्यानं क्रिकेट खेळत आहे. तसंच या सीरिजनंतर लगेच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय टीम (India  tour of South Africa) जाणार आहे. हे भरगच्च वेळापत्रक लक्षात घेता रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत (Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या चार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पहिल्यांदाच मुंबईकर श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी श्रेयसनं 22 वन-डे आणि 29 T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर त्यानं 92 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 52.18 च्या सरासरीनं 4592 रन काढले आहेत. यामध्ये 12 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.तर 202 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. द्रविडनं दाखवला विश्वास टीम इंडियाची मिडल ऑर्डर हा इंग्लंड दौऱ्यात चिंतेचा विषय  होता. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना इंग्लंड दौऱ्यात त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मिडल ऑर्डरची ही चिंता दूर करण्यासाठी श्रेयसवर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) विश्वास दाखवला आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये श्रेयसला कानपूर टेस्टमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच या सीरिजमधील दुसरी टेस्ट ही श्रेयसच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच मुंबईत होत आहे. त्यामुळे आता द्रविडनं दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी श्रेयसवर असेल. संपूर्ण स्पर्धेची मेहनत 3 बॉलमध्ये वाया, एका मॅचमध्ये झाला हिरो ते व्हिलन प्रवास भारत-न्यूझीलंड टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया अजिंक्य रहाणे (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा (व्हाईस कॅप्टन), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. टीप: विराट कोहलीला कानपूर टेस्टसाठी विश्रांती देण्यात आली असून तो मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियात सहभागी होईल
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rahul dravid, Shreyas iyer, Team india

    पुढील बातम्या