Elec-widget

India Vs New Zealand:आजही पाऊस झाला तर कोण पोहोचणार अंतिम फेरीत?

India Vs New Zealand:आजही पाऊस झाला तर कोण पोहोचणार अंतिम फेरीत?

सेमीफायनल सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे आज बुधवारी उर्वरीत सामना आज खेळवला जाणार आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 10 जुलै: ICC Cricket World Cupमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. मंगळवारी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या. पण त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि मँचेस्टरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सेमीफायनल सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे आज बुधवारी उर्वरीत सामना आज खेळवला जाणार आहे.

ICCने सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पण आज भारतीय चाहत्यांसाठी हवामान विभागाकडून फार चांगली बातमी नाही. कारण आज देखील मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. आता सामना सेमीफायनलमधील असल्यामुळे विजेता संघ ठरवणे गरजेचे आहे. साखळी फेरी प्रमाणे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाऊ शकत नाही.

कोण जाणार फायनलमध्ये...

अंतिम फेरीत कोणता संघ प्रवेश जाणार यासाठी साखळी फेरीतील कामगिरीचा विचार केला जातो आणि त्याचा थेट फायदा भारतीय संघाला मिळू शकतो. जर राखीव दिवशी पाऊस झाला आणि त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर भारतीय संघ सामना न खेळताच अंतिम फेरीत पोहोचेल. साखळी फेरीत भारतीय संघाने 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 9 पैकी केवळ 5 सामन्यात विजय मिळवला होता. सरासरीच्या जोरावर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे साखळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता सेमीफायनलमध्ये देखील या दोन्ही संघांच्या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे.

Loading...

वर्ल्ड कपच्या नियामानुसार पावसामुळे सामना जेथे थांबवण्यात आला होते तेथूनच पुन्हा सुरु केला जातो. पण जर पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर मात्र साखळी फेरीतील कामगिरीचा विचार केला जाईल. भारतीय संघाने साखळी फेरीत सर्वाधिक सामने जिंकत गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले आहे. याशिवाय जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर द्वारे विजेता ठरवला जाईल.

SPECIAL REPORT : ही मुंबई नव्हे अमेरिका, ट्रम्प यांच्याही घरात शिरले पाणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 07:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...