Home /News /sport /

IND vs NZ: भारतीय खेळाडूचा क्लीन बोल्ड झाल्यानंतरही मैदानातून जाण्यास नकार, थर्ड अंपायरकडे मागितली दाद

IND vs NZ: भारतीय खेळाडूचा क्लीन बोल्ड झाल्यानंतरही मैदानातून जाण्यास नकार, थर्ड अंपायरकडे मागितली दाद

कोणत्याही क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅटर क्लीन बोल्ड झाला असेल तर तो अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता परत जाण्यासाठी चालू लागतो. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये सुरू असलेल्या टेस्टमध्ये अजबच घडलं.

    मुंबई, 4 डिसेंबर : कोणत्याही क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅटर क्लीन बोल्ड झाला असेल तर तो अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता परत जाण्यासाठी चालू लागतो. मुंबई टेस्टमध्ये अजबच घडलं.  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टचा शनिवारी दुसरा दिवस आहे. या दिवशी सकाळच्या सत्रात टीम इंडियाला दोन धक्के झटपट बसले. पहिल्या दिवशी चार विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलनं (Ajaz Patel) या दोन्ही विकेट्स घेतल्या. एजाजनं सुरुवातीला ऋद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) आऊट करत मुंबई टेस्टमध्ये पाच विकेट्स पूर्ण केल्या. साहानं 27 रन काढले. त्यानंतर पटेलनं लगेच पुढच्या बॉलवर आर. अश्विनला आऊट करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. एजाजनं टाकलेल्या बॉलवर अश्विन फसला. तो बॉल त्याच्या बॅटला चकवून थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे अश्विन क्लीन बोल्ड झाला होता. तरीही अश्विननं लगेच जाण्यास नकार दिला. त्यानं थर्ड अंपायरकडे दाद मागितली. अश्विनच्या निर्णयामुळे ही मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांसह कॉमेंट्री करणारे देखील चकित झाले. अश्विननं थर्ड अंपायरकडं दाद का  मागितली? याचा खुलासा लगेच झाला. वास्तविक आपण बोल्ड झाल्याचं त्याला लक्षात आलंच नाही. आपल्याला अंपायरनं कॅच आऊट दिल्याचा अश्विनचा समज झाला होता. त्यामुळे त्यानं थर्ड अंपायरकडे दाद मागितली होती. IPL 2022: विराट आणि ABD पुन्हा येणार एकत्र! RCB च्या हेड कोचनं दिले संकेत एजाज पटेलनं दुसऱ्या दिवसातील त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला लागोपाठ 2 धक्के दिले. अक्षर पटेलनं (Axar Patel) त्याची हॅट्ट्रिक चुकवली. पहिल्या दिवसाचा शतकवीर मयांक अग्रवालला अक्षर पटेलनं साथ देत सातव्या विकेट्ससाठी 50 रनची पार्टनरशिप पूर्ण केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, R ashwin, Team india

    पुढील बातम्या