मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: मयंक अग्रवालनं सांगितलं शतकाचं रहस्य, 2 दिग्गजांना दिलं यशाचं श्रेय

IND vs NZ: मयंक अग्रवालनं सांगितलं शतकाचं रहस्य, 2 दिग्गजांना दिलं यशाचं श्रेय

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 2nd Test) मयंक अग्रवालनं (Mayank Agarwal) टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 2nd Test) मयंक अग्रवालनं (Mayank Agarwal) टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 2nd Test) मयंक अग्रवालनं (Mayank Agarwal) टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले.

मुंबई 4 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 2nd Test) मयंक अग्रवालनं (Mayank Agarwal) टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. मयंकनं पहिल्या दिवशी शतक झळकावले. तो दिवसअखेर 120 रन काढून नाबाद होता. मुंबई टेस्टपूर्वी मयंकची  टीम इंडियातून हकालपट्टी होण्याची चर्चा होती.

मयंकने या शतकाचे श्रेय भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गजांना दिले आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर त्यानं सांगितलं की, 'टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये निवड झाल्यानंतर मी राहुल भाई (द्रविड) यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला मैदानात सर्वोत्तम खेळ करण्याचा सल्ला दिला. मला जी सुरुवात मिळाली होती, त्याचा फायदा घेता आला याचा आनंद आहे.'

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजपूर्वी मयंक जखमी झाला होता. या दुखापतीमुळे त्याला त्या सीरिजमध्ये खेळता आलं नाही. ती दुर्दैवी घटना होती असं मयंक यावेळी म्हणाला. 'इंग्लंडमध्ये खेळू शकलो नाही, हे माझं दुर्दैव होतं. मला दुखापत झाली होती. त्यानंतर मी जास्त काही करू शकत नव्हतो. मी ती परिस्थिती स्विकारली. माझा खेळ सुधारण्यावर भर दिला, तसंच कष्ट करणेही सोडले नाही.'

मयंकने यावेळी राहुल द्रविड प्रमाणेच टीम इंडियाचे आणखी एक महान खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनही या शतकाचं श्रेय दिलं आहे. 'मला त्यांनी इनिंगच्या सुरुवातीला बॅट थोडी खाली ठेवण्यावर विचार करण्याचा सल्ला दिला. मी बॅट वर ठेवतो. मला इतक्या कमी वेळात बदल करणे शक्य नव्हते. मी त्यांचे व्हिडीओ पाहिले. त्यांच्या खांद्याच्या स्थितीचा अभ्यास केला.' असा खुलासा मयंकने यावेळी केला.

जय शहांच्या जाळ्यात अडकली गांगुलीची टीम, दादाच्या टीमचा फक्त 1 रननं पराभव!

मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाची अवस्था 3 आऊट 80 अशी होती. यानंतर मयंक अग्रवालने श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer)  80 रनची पार्टनरशीप केली, पण श्रेयस अय्यर 18 रन करून आऊट झाला. आता मयंक आणि ऋद्धीमान साहा यांच्यात नाबाद 61 रनची पार्टनरशीप झाली आहे. मुंबईमधल्या खराब वातावरणामुळे पहिल्या दिवशी 70 ओव्हरचाच खेळ झाला.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Rahul dravid, Sunil gavaskar, Team india