तर, 'शुक्रवारी सकाळी वानखेडेवरील परिस्थिती टेस्ट मॅच खेळण्यासाठी 100 टक्के योग्य नव्हती. खेळाडूंची सुरक्षा हे आमचं मुख्य प्राधान्य आहे, त्यामुळे टॉस उशीरा घेण्याचा निर्णय घ्यावा लागला,' असे अंपायर नितिन मेनन यांनी स्पष्ट केले आहे. IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला 3 मोठे धक्के, दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील वाटचालीसाठी मुंबई टेस्ट दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. कानपूर टेस्टमध्ये शेवटची विकेट घेण्यात अपयश आल्यानं टीम इंडियाला ड्रॉ वर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारतीय टीमला 8 पॉईंट्सचा फटका बसला आहे. भारतीय टीम 2013 पासून मायदेशात एकही टेस्ट सीरिज हरलेली नाही. हा रेकॉर्ड कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. तर न्यूझीलंडला 66 वर्षांमध्ये भारतात एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न पाहुणी टीम करणार आहे.UPDATE - Toss will take place at 11.30 AM.
Match starts at 12 PM. 78 overs to be bowled.#INDvNZ @Paytm pic.twitter.com/c324ZF03ge — BCCI (@BCCI) December 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Mumbai, Team india