मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियात होणार 3 बदल, पाहा कशी असेल Playing11

IND vs NZ: न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियात होणार 3 बदल, पाहा कशी असेल Playing11

टीम इंडियाला (Team India) मुंबईत होणारी दुसरी आणि शेवटची टेस्ट जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये (Team India Playing11) 3 बदल होतील, असा अंदाज आहे.

टीम इंडियाला (Team India) मुंबईत होणारी दुसरी आणि शेवटची टेस्ट जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये (Team India Playing11) 3 बदल होतील, असा अंदाज आहे.

टीम इंडियाला (Team India) मुंबईत होणारी दुसरी आणि शेवटची टेस्ट जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये (Team India Playing11) 3 बदल होतील, असा अंदाज आहे.

मुंबई, 2 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs New Zealand 2nd Test) शुक्रवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. टी20 मालिकेत सपाटून मार खालेल्या न्यूझीलंडच्या टीमनं कानपूर टेस्टमध्ये पुनरागमन केलं. न्यूझीलंडच्या शेवटच्या जोडीनं चिवट खेळ करत टीम इंडियाला विजय मिळवू दिला नाही. आता ही सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला मुंबईत होणारी दुसरी आणि शेवटची टेस्ट जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये (Team India Playing11) 3 बदल होतील, असा अंदाज आहे.

विराटसाठी कुणाला वगळणार?

टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मुंबई टेस्टमध्ये खेळणार आहे. विराट कोहलीला खेळवण्यासाठी एका बॅटरला वगळणे भाग आहे. तो बॅटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) असेल अशी चर्चा होती. टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन असलेल्या रहाणेचा फॉर्म सध्या हरपला आहे. कानपूर टेस्टमध्येही तो फार काही करू शकला नव्हता. पण राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विराटला खेळवण्यासाठी अजिंक्य रहाणेला नाही तर ओपनर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) याला वगळले जाऊ शकते.

भरतला मिळणार पदार्पणाची संधी!

कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाचा विकेट किपर ऋद्धीमान साहाची (Wriddhiman Saha) मान दुखावली होती. त्यामुळे राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या केएस भरतने (KS Bharat) विकेटकिपिंग केले. भरतनं त्याच्या खेळानं सर्वांनाच प्रभावित केले होते. साहाच्या खेळण्याबात ऐनवेळी निर्णय घेणार असल्याचं बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी स्पष्ट केले आहे.

साहाच्या जागेवर भरतला मुंबईच पदार्पणाची संधी मिळू शकते. आंध्र प्रदेशातून क्रिकेट खेळणारा भरत ओपनिंग बॅटर देखील आहे. त्यामुळे तो शुभमन गिलसोबत ओपनिंग करेल आणि विराटसाठी मयांक अग्रवालला वगळणे टीम मॅनेजमेंटला शक्य होईल.

इशांत शर्माची होणार हकालपट्टी

टीम इंडियाचा सर्वाात अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मानं (Ishant Sharma) कानपूर टेस्टमध्ये निराशा केली. त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. आता मुंबईतील निर्णायक टेस्टमध्ये विराट कोहली त्याचा विश्वासू बॉलर मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संधी देण्याची शक्यता आहे.

IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये बदलणार विराटचं नशीब, 741 दिवसांची प्रतीक्षा संपणार!

टीम इंडियाची संभाव्य Playing 11: शुभमन गिल, केएस भरत, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india