मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : कानपूरमध्ये साहानं केला नवा रेकॉर्ड, 75 वर्षानंतर भारतीयानं केली 'ही' कामगिरी

IND vs NZ : कानपूरमध्ये साहानं केला नवा रेकॉर्ड, 75 वर्षानंतर भारतीयानं केली 'ही' कामगिरी

कानपूर टेस्टमध्ये मैदानात उतरण्यापूर्वीच टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. गेल्या 75 वर्षात कोणत्याही भारतीयाला न जमलेली कामगिरी त्यानं केली आहे.

कानपूर, 26 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) सध्या कानपूरमध्ये खेळली जात आहे. या टेस्टमध्ये मैदानात उतरण्यापूर्वीच टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. गेल्या 75 वर्षात कोणत्याही भारतीयाला न जमलेली कामगिरी त्यानं केली आहे.

ऋद्धीमान साहा 1946 नंतर टीम इंडियाकडून टेस्ट मॅच खेळणारा सर्वात ज्येष्ठ विकेट किपर बनला आहे. साहाचं वय सध्या 37 वर्ष 32 दिवस आहे. त्यानं कानपूर टेस्टमध्ये माजी भारतीय विकेट किपर फारूख इंजिनिअर यांना मागे टाकलं आहे. इंजिनिअर यांनी 36 वर्ष 338 दिवस वय असताना टीम इंडियाकडून टेस्ट मॅचमध्ये विकेट किपिंग केली होती. भारताकडून हा रेकॉर्ड दत्ताराम हिंदळेकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 37 वर्ष 231 दिवस वय होते तेव्हा शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. साहाला कानपूर टेस्टमध्ये बॅटींगनं काही कमाल करता आली नाही. तो फक्त 1 रन काढून आऊट झाला.

बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या साहानं 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या टेस्टमध्ये पदार्पण केले होते. पण, त्याला आधी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि आता ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यामुळे कायमच स्टँडबायची भूमिका करावी लागली आहे.

IND vs NZ: श्रेयस Out होताच टीम इंडियाची निराशा, पहिल्या इनिंगमध्ये केली मोठी चूक

साहानं 11 वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये फक्त 38 टेस्ट खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 29.09 च्या सरासरीनं 1251 रन केले आहेत. त्यानं 3 शतक आणि 5 अर्धशतक झळकावली असून 92 कॅच आणि 11 स्टंपिंग करण्याची कामगिरी देखील केली आहे.

First published:

Tags: Cricket, New zealand, Team india