कानपूर, 29 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टचा सोमवारी पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात टीम इंडियाला जोरदार धक्के बसले होते. टीम इंडियाची मिडल ऑर्डर पुन्हा एकदा कोसळली. त्यामुळे अडचणीत आलेल्या टीमला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) या जोडीने बाहेर काढले. या दोघांनीही झळकावलेल्या अर्धशतकामुळे भारतीय टीमला दुसरी इनिंग 7 आऊट 234 वर घोषित करता आली.
श्रेयस अय्यर 65 रनवर आऊट झाला. त्यानंतर साहानं अक्षर पटेलच्या (Axar Patel) मदतीनं 8 विकेट्ससाठी नाबाद 67 रनची भागिदारी केली. साहाने नाबाद 61 रनची खेळी करत टीम इंडियासाठी संकटमोचकाची कामगिरी केली. साहाच्या या कामगिरीची टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी प्रशंसा केली आहे.
राठोडनं अनुभवी विकेट किपरबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, 'त्याची (साहा) मान दुखावली होती. तरीही तो एक आदर्श खेळाडू आहे. तो टीमला आवश्यक आहे, तेच करेल. त्यानं टीमसाठी अनेक अवघड गोष्टी केल्या आहेत. चौथ्या दिवशीही त्यानं बिकट परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
IND vs NZ: कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय नक्की, न्यूझीलंडला इतिहास बदलण्याचं आव्हान
मला नेहमीच त्याच्याकडून या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असते. नेहमी विश्वास ठेवावा असा तो खेळाडू आहे. त्याचबरोबर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमच्याकडं ऋषभ पंत आहे. तो आमचा नंबर 1 विकेट किपर आहे. त्यानं मागील काही वर्षांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. साहा दुसऱ्या क्रमांवर असून पंत उपलब्ध नसेल तेव्हा आम्हाला त्याची गरज आहे.' असे राठोडने सांगितले.
साहासमोर भरतचे आव्हान
ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) मानेच्या दुखापतीमुळे तिसऱ्या दिवशी विकेट किपिंग करु शकला नव्हता. , त्यामुळे साहाच्या ऐवजी श्रीकर भरत (Srikar Bharat) विकेट कीपिंगसाठी मैदानात उतरला.एक स्टम्पिंग केले आणि दोन कॅच पकडले. श्रीकर भरतने केलेल्या विकेट कीपिंगबद्दल त्याचं कौतुक झालं. त्यामुळे आता ऋद्धीमान साहासमोर श्रीकर भरतचे आव्हान निर्माण झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, New zealand, Team india