मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय नक्की, न्यूझीलंडला इतिहास बदलण्याचं आव्हान

IND vs NZ: कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय नक्की, न्यूझीलंडला इतिहास बदलण्याचं आव्हान

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया भक्कम स्थितीमध्ये आहे. भारतीय पिचवरील इतिहास पाहाता पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजय नक्की आहे.

  • Published by:  News18 Desk

कानपूर, 29 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया भक्कम स्थितीमध्ये आहे. आता सोमवारी या टेस्टच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडला 284 रनचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. हे लक्ष्य इतकं सोपं नाही. न्यूझीलंडची दुसऱ्या इनिंगमध्ये सुरूवात खराब झाली असून त्यांनी एक विकेट देखील गमावली आहे. आता न्यूझीलंडला या मॅचमध्ये विजय मिळवायचा असेल तर इतिहास रचावा लागेल.

टीम इंडियानं भारतामध्ये गेल्या दशकात फक्त 4 टेस्ट गमावल्या आहेत. होम ग्राऊंडवरील टीम इंडियाचा हा दबदबा मोडणे सोपे नाही. कानपूरमध्ये देखील सर्वाधिक रनचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड पाहता टीम इंडियाचा विजय नक्की मानला जात आहे. भारतीय पिचवर चौथ्या इनिंगमध्ये टार्गेटचा पाठलाग करणे हे नेहमीच अवघड असते. विशेषत: विदेशी टीमना भारतीय स्पिनर्सचं मोठं आव्हान पार करणे हे नेहमीच कठीण गेले आहे.

कानपूर टेस्टमध्ये न्यूझीलंडला मॅच जिंकण्यासाठी 34 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडावा लागेल. हा रेकॉर्ड आजवर मोडणे अनेक दिग्गज टीमनाही जमलेलं नाही. भारतामध्ये कोणत्याही विदेशी टीमनं आजवर चौथ्या इनिंगमध्ये 276 पेक्षा जास्त टार्गेट यशस्वीपणे पूर्ण केलेले नाही. 1987 साली व्हिव रिचर्डस यांच्या वेस्ट इंडिज टीमनं दिल्ली टेस्टमध्ये 276 रनचे टार्गेट यशस्वी पूर्ण केले होते.

इंग्लंडनंतर भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाचं वादळ, भारतीय स्पिनरचे गंभीर आरोप

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवरही आजवर चौथ्या इनिंगमध्ये सर्वात जास्त 83 रनचं टार्गेट यशस्वीपणे पूर्ण करता आलेले आहे. टीम इंडियानं 1999 साली न्यूझीलंडविरुद्ध हे टार्गेट पूर्ण केले होते. विदेशी टीममध्ये इंग्लंडने 1956 साली 76 रनचं टार्गेट पूर्ण केले होते. त्यामुळे न्यूझीलंडसाठी सोमवारी 284 रनचे टार्गेट पूर्ण करणे सोपे नाही. अर्थात क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नसते. त्यामुळे केन विल्यमसनच्या टीमला सोमवारी टेस्ट मॅच जिंकण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india