कानपूर, 29 नोव्हेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेली टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत आली आहे. या टेस्टच्या सोमवारी पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सेशनवर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. चौथ्या दिवशी खेळ संपण्यापूर्वी बॅटींगला आलेल्या विल्यम समरविले (William Somerville) नाईट वॉचमनने भारतीय बॉलर्सची चांगलीच परीक्षा घेतली. त्याने टॉम लॅथमच्या (Tom Latham) मदतीने पहिल्या सत्रात किल्ला लढवला. या दोघांनी लंचपर्यंत खेळून काढले. लंचसाठी खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडनं 1 आऊट 79 रन काढले होते.
लंचनंतर लगेच उमेश यादवनं (Umesh Yadav) समरविलेला आऊट करत टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेली जोडी फोडली. समरविलेनंतर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) बॅटींगसाठी आला. त्यानं आणि लॅथमनं संथ बॅटींग करत मॅच ड्रॉ करण्याचा न्यूझीलंडचा इरादा जाहीर केला. लॅथमनं पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्येही अर्धशतक झळकावले. अनुभवी स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) लॅथमला आऊट केलं. लॅथमला आऊट करताच अश्विननं नव्या रेकॉर्डची नोंद केली. त्यानं हरभजनसिंगला मागे टाकले. अश्विन आता टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय ऑफ स्पिनर बनला आहे.
Stat Alert - With 418 wickets, @ashwinravi99 becomes India's third-highest wicket-taker in Tests.#TeamIndia pic.twitter.com/TRvelxZ1Wk
— BCCI (@BCCI) November 29, 2021
टी टाईमला काही मिनिटे बाकी असताना रविंद्र जडेजानं अनुभवी रॉस टेलरला (Ross Taylor) आऊट करत टीम इंडियाचा चौथं यश मिळवून दिलं. टी टाईमनंतर अक्षर पटेलनं (Axar Patel) या इनिंगमधील त्याची पहिली विकेट घेतली. त्याने निकेल्सला आऊट केले.
PAK vs BAN: बांगलादेशी खेळाडूच्या डोक्याला लागला आफ्रिदीचा बॉल, सोडावी लागली मॅच
निकोल्सची विकेट गेल्यानंतर जडेजानं टीम इंडियाला सर्वात मोठं यश मिळवून दिलं. त्यानं एक बाजू लावून धरलेल्या केन विल्यमसनला आऊट केलं. विल्यमसन 24 रन काढून आऊट झाला. तर अश्विननं ब्लंडेलला आऊट करत टीम इंडियाला सातवं यश मिळवून दिलं आहे. पाचव्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये निराशा केलेल्या भारतीय स्पिनर्सनी नंतर कमबॅक करत न्यूझीलंडला हादरे दिले आहेत. आता या मॅचचा शेवटचा तास शिल्लक असून यामध्ये न्यूझीलंडला ऑल आऊट करत ही टेस्ट जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, R ashwin, Team india