मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: श्रेयस Out होताच टीम इंडियाची निराशा, पहिल्या इनिंगमध्ये केली मोठी चूक

IND vs NZ: श्रेयस Out होताच टीम इंडियाची निराशा, पहिल्या इनिंगमध्ये केली मोठी चूक

कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियानं एक मोठी संधी गमावली आहे. (फोटो - @BLACKCAPS)

कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियानं एक मोठी संधी गमावली आहे. (फोटो - @BLACKCAPS)

कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी (India vs New Zealand First Test Day 2) टीम इंडियाची नजर मोठ्या स्कोअरवर होती. टीम इंडिया 400 पेक्षा जास्त रन करेल असा सर्वांचा अंदाज होता. पण भारतीय टीमच्या लोअर ऑर्डरनं पुन्हा एकदा निराशा केली आहे.

पुढे वाचा ...

कानपूर, 26 नोव्हेंबर : कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी  (India vs New Zealand First Test Day 2) टीम इंडियाची नजर मोठ्या स्कोअरवर होती. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ही जमलेली जोडी मैदानात होती. त्यामुळे टीम इंडिया 400 पेक्षा जास्त रन करेल असा सर्वांचा अंदाज होता. पण भारतीय टीमच्या लोअर ऑर्डरनं पुन्हा एकदा निराशा केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोअर करत न्यूझीलंडवर दबाव टाकण्याची संधी त्यांनी गमावली आहे.

कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी लंचनंतर काही वेळात टीम इंडियाची पहिली इनिंग 345 रनवर संपुष्टात आली. श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणातील शतक हे या इनिंगचं मुख्य वैशिष्ट्य ठरले. श्रेयसनं 105 रन काढले. तर दुसऱ्या दिवशी आर. अश्विननं (R. Ashwin) 38 रन करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. श्रेयस आणि अश्विनच्या प्रयत्नानंतरही टीम इंडियाला 350 चा टप्पा ओलांडण्यात अपयश आले.

न्यूझीलंडकडून टीम साऊदी (Tim Southee) सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 69 रन देत 5 विकेट्स घेतल्या. जेमिसननं 3 तर एजाज पटेलनं 2 विकेट्स घेतल्या. पहिल्या दिवशी फक्त 1 विकेट घेणाऱ्या साऊदीनं शुक्रवारी कमाल केली. त्यानं जडेजा, अय्यर, साहा आणि अक्षर पटेल यांना आऊट करत पाच विकेट्स पूर्ण केल्या. कानपूर टेस्टमध्ये 42 वर्षांनंतर पहिल्यांदाच विदेशी फास्ट बॉलरनं  5 विकेट घेतल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) नंतर न्यूझीलंची ही पहिलीच टेस्ट आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं कॅप्टन विराट कोहलीसह रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या 5 जणांना विश्रांती दिली आहे. अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यानं श्रेयसला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानं शतक झळकावत या संधींचं सोनं केलं. टीम इंडियाचा आणखी एक तरूण बॅटर शुभमन गिलनं देखील अर्धशतक झळकावले. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे अनुभवी खेळाडू  मोठी खेळी करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले.

IND vs NZ: श्रेयसच्या शतकानंतर वाढली कॅप्टनची अडचण, विराट परतल्यानंतर कुणाला करणार बाहेर?

First published:

Tags: Cricket, Team india