मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: भर मैदानात अश्विन आणि अंपायरमध्ये वाद, द्रविडनं केली मॅच रेफ्रीशी चर्चा

IND vs NZ: भर मैदानात अश्विन आणि अंपायरमध्ये वाद, द्रविडनं केली मॅच रेफ्रीशी चर्चा

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्पिन बॉलर आर. अश्विनचा (R. Ashwin) अंपायरशी वाद झाला.

  • Published by:  News18 Desk

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्पिन बॉलर आर. अश्विनचा (R. Ashwin) अंपायरशी वाद झाला. अश्विननं राऊंड द विकेट बॉलिंग करत होता. त्यावेळी तो सरळ न जाता अंपायरच्या समोरून क्रॉस जात होता. यावर अंपायरने आक्षेप घेतला. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. अंपायर नितिन मेनन यांनी यावेळी अश्विनशी चर्चा केली.

काय घडला प्रकार?

न्यूझीलंडच्या इनिंगमधील 77 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी अंपायरने अश्विनला रोखले आणि त्याला इशारा दिला. अश्विन डेंजर एरियामध्ये येत असल्याची सूचना अंपायरनं केली. पण, टीव्ही रिप्लेमध्ये तो या भागापासून दूर असल्याचे स्पष्ट दिसत होते. अश्विनच्या फॉलो थ्रूमुळे  बॉल पाहण्यास त्रास होत असल्याचा आक्षेप अंपायरने घेतला. या मुद्यावर अश्विननं त्याची बाजू अंपायरकडे मांडली. टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) देखील यावेळी अंपायरकडे धाव घेत अश्विनसोबत त्यांच्याशी चर्चा केली.

द्रविडनं घेतली रेफ्रीची भेट

मैदानात हा सर्व प्रकार सुरू असतानाच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Rahul Dravid) मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांची त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतल्याचं टीव्हीवर दाखवण्यात आले. द्रविडनं कोणत्या मुद्यावर श्रीनाथशी चर्चा केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, त्यांच्या भेटीतही या वादाचा विषय निघाला असल्याची दाट शक्यता आहे.

IND vs NZ: कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीच्या खास व्यक्तीची मैदानात एन्ट्री

कानपूर टेस्टमध्ये खराब अंपायरिंग

कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी खराब अंपायरिंगनं सर्वांनाच निराश केले. 73 व्या ओव्हरमध्ये अश्निनच्या बॉलिंगवर लॅथमच्या विरोधात LBW चं जोरदार अपिल करण्यात आले. अंपायरने हे अपिल फेटाळले. टीम इंडियानं यावेळी रिव्ह्यू घेतला नाही. टीव्ही रिप्लेमध्ये हा खूप जवळचा विषय असल्याचे दिसत होते.

अश्विननंच टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. त्याने विल यंगला आऊट दिले. ऋद्धीमान साहाच्या जागी विकेटकिपर म्हणून मैदानात उतरलेल्या केएस भरतनं यावेळी रिव्ह्यू घेण्याचा आग्रह केला, तो आग्रह यशस्वी ठरला.

First published:

Tags: Cricket, R ashwin, Rahul dravid