मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: चहर Live मॅचमध्ये शोधत होता गर्लफ्रेंड, बहिणीनं शेअर केला VIDEO

IND vs NZ: चहर Live मॅचमध्ये शोधत होता गर्लफ्रेंड, बहिणीनं शेअर केला VIDEO

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात बुधवारी (17 नोव्हेंबर) रोजी टी20 मालिकेतील पहिला सामना झाला. या मॅचमधील दीपक चहरचा (Deepak Chahar) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

जयपूर, 18 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात बुधवारी (17 नोव्हेंबर) रोजी टी20 मालिकेतील पहिला सामना झाला. टीम इंडियानं हा सामना 5 विकेट्स आणि 2 बॉल राखून जिंकला. दीपक चहर (Deepak Chahar) या मॅचमधील प्लेईंग 11 चा सदस्य होता. तो घरच्या मैदानावर पहिल्यांदाच टीम इंडियाकडून मॅच खेळला. या मॅचमध्ये त्याची आणि मार्टीन गप्टीलची (Martin Guptill) खुन्नस पाहयला मिळाली. त्याचबरोबर तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.

दीपकचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दीपक त्याची गर्लफ्रेंड आणि होणारी पत्नी जया भारद्वाजला (Jaya Bhardwaj) शोधत होता. हा व्हिडीओ दीपकची बहीण मालती चहरनं  (Malti Chahar) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. दीपकनं आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात जयाला स्टेडियममध्येच प्रपोज केलं आणि नंतर साखरपुड्याची अंगठी घातली होती.

न्यूझीलंडच्या इनिंगमधील 8 व्या ओव्हरचा हा व्हिडीओ आहे. दीपक त्यावेळी बाऊंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंग करत होता. त्यावेळी मालती त्याची थट्टा करत होती. मालती त्याला सतत हाका मारत होती.पण, दीपकनं सुरूवातीला तिच्याकडं पाहिलं नाही. त्यानंतर दीपक मालतीकडं पाहून हसला, पण त्याचे डोळे कुणाला तरी शोधत होते. मालतीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'ती कुठं आहे?' असं बहिणीला विचारत असल्याचं ऐकू येत आहे.

टीम इंडियाच्या जर्सीतील घरच्या प्रेक्षकांसमोरची पहिली मॅच दीपकसाठी खास गेली नाही. त्यानं 4 ओव्हरमध्ये 42 रन दिले आणि मार्टीन गप्टीलची विकेट घेतली. न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 165 रनचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियानं सूर्यकुमार यादव (62) आणि रोहित शर्मा (48) यांच्या जोरावर पूर्ण केलं. या विजयाबरोबरच टीम इंडियानं 3 मॅचच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरी मॅच शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे.

IND vs NZ: दीपक चहरनं गप्टीलला दिला जबरदस्त लूक, VIDEO VIRAL

First published: