मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : ऐतिहासिक कामगिरीनंतरही एजाझ पटेलवर अन्याय, क्रिकेट फॅन्स निर्णयावर नाराज

IND vs NZ : ऐतिहासिक कामगिरीनंतरही एजाझ पटेलवर अन्याय, क्रिकेट फॅन्स निर्णयावर नाराज

न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलसाठी (Ajaz Patel) मुंबई टेस्ट सर्वात खास ठरली आहे. त्यानं टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेत इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीनंतरही त्याच्यावर अन्याय झाला आहे.

मुंबई, 6 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टमध्ये पाहुण्या टीमचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतरही न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलसाठी (Ajaz Patel) ही मॅच सर्वात खास ठरली आहे. त्यानं टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेत इतिहास रचला. 1877 साली आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटला सुरूवात झाली. तेव्हापासून हे फक्त तिसऱ्यांदा घडले असून 21 व्या शतकामध्ये तर पहिल्यांदाच एखाद्या बॉलरनं ही कामगिरी केली आहे.

एजाझनं टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगमध्येही दमदार कामगिरी करत 4 विकेट्स घेतल्या. एजाझनं संपूर्ण टेस्टमध्ये 14 विकेट्स घेतल्या. वानखेडे स्टेडियमवरील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या सर्व कामगिरीनंतरही या टेस्टसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देताना एजाझकडे दुर्लक्ष करण्यात आले. टीम इंडियाचा बॅटर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

मयंकला हा पुरस्कार देताच नवा वाद सुरू झाला आहे. या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मयंक का ठरला मानकरी?

मुंबई टेस्टमधील चारही इनिंगमध्ये स्पिनर्सचं वर्चस्व होते. त्यांचा सामना करताना दोन्ही टीमच्या बॅटर्सची तारांबळ उडाली. बॅटींगसाठी अवघड पिचवरही मयंकने पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रनची खेळी केली. मयंकने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या रनचे निम्मे रनही न्यूझीलंडच्या संपूर्ण टीमला पहिल्या इनिंगमध्ये करता आले नाहीत. दोन्ही इनिंगमध्ये मयंकने केलेल्या खेळी टीम इंडियाच्या मोठ्या विजयात निर्णायक ठरल्या. हा सर्व विचार केल्यानंतरच मयंकची 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, New zealand, Team india