मुंबई, 3 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टेस्ट आजपासून (शुक्रवार) मुंबईमध्ये होत आहे. या सीरिजसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (WTC) पुढील प्रवासासाठी ही टेस्ट जिंकणे दोन्ही टीमना आवश्यक आहे. सामान्यपणे भारतामधील टेस्ट सीरिजमध्ये यजमान टीम इंडियाचं पारडं नेहमीच जड असतं. पण, कानपूर टेस्ट (India vs New Zealand) ड्रॉ करत न्यूझीलंडच्या टीमनं आपल्याला कमी लेखू नये हा इशारा दिला आहे. भारतीय पिचवर यापूर्वी न्यूझीलंडनं सलग 7 टेस्ट गमावल्या होत्या. ती परंपरा कानपूरमध्ये पाहुण्या टीमनी तोडली आहे. आता आणखी एका विक्रमावर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनची (Kane Williamson) नजर असेल.
न्यूझीलंडच्या टीमला आजवर भारतात कधीही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. 1988 साली त्यांनी भारतामध्ये अखेरची टेस्ट मॅच जिंकली होती. त्यानंतर दोन्ही टीमनी 18 टेस्ट खेळल्या, ज्यातल्या 9 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 9 मॅच ड्रॉ झाल्या. न्यूझीलंडला भारतात 34 पैकी फक्त 2 टेस्ट जिंकता आल्या आहेत. न्यूझीलंडने भारतात पहिली टेस्ट 1955 साली खेळली होती, म्हणजेच 66 वर्षांमध्ये त्यांना भारतात एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही
India vs NZ 2nd Test Live Streaming: मुंबई टेस्ट कधी आणि कुठे पाहता येणार?
मुंबईशी खास कनेक्शन
मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा इतिहास हा पाहुण्या टीमला दिलासा देणारा आहे. याच पिचवर 1988 साली त्यांनी भारतामधील शेवटची टेस्ट मॅच जिंकली होती. सर रिचर्ड हॅडली (Sir Richard Hadlee) यांनी चौथ्या इनिंगमध्ये केलेल्या भेदक बॉलिंगमुळे टीम इंडियाचा 136 रननं पराभव झाला होता. न्यूझीलंडनं ही टेस्ट जिंकली तेव्हा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) वय फक्त 3 आठवडे होते. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनचा तर जन्मही झाला नव्हता.
न्यूझीलंडला का आहे संधी?
टीम इंडियानं या टेस्ट सीरिजमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या चार प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. कॅप्टन विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील बॅटरचा फॉर्म फारसा चांगला नाही. त्यातच मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे वानखेडेचं पिच पहिल्या दिवशी स्विंग बॉलर्सना मदत करेल अशी शक्यता आहे. स्विंग बॉलिंग हे न्यूझीलंडचं बलस्थान आहे. त्यामुळेच केन विल्यमसनच्या न्यूझीलंडच्या टीमला मुंबई टेस्टसह 66 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये सीरिज जिंकण्याची संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india