• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: मुंबईकरांसाठी Good News, दुसऱ्या टेस्टबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: मुंबईकरांसाठी Good News, दुसऱ्या टेस्टबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

न्यूझीलंडची टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट (India vs New Zealand 2nd Test) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये ( Wankhede stadium, Mumbai) होणार आहे

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर: कोरोना काळातील मोठ्या ब्रेकनंतर मुंबईत पुढील महिन्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच होणार आहे. न्यूझीलंडची टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट (India vs New Zealand 2nd Test) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium, Mumbai) होणार आहे. 3 ते 7 डिसेंबर दरम्यान ही टेस्ट मॅच होणार आहे. भारत-न्यूझीलंड टेस्टपूर्वी महाराष्ट्र सरकारनं सर्व क्रिकेट फॅन्सना एक आनंदाची बातमी दिली आहे. न्यूज एजन्सी ANI नं दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र सरकारनं या मॅचसाठी वानखेडे स्टेडियच्या संपूर्ण क्षमतेइतके म्हणजेच  100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी (MCA) ही माहिती दिली आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना कोरोनाबाबतच्या गाईडलाईन्स पाळून मॅचचा आनंद स्टेडियममध्ये उपस्थित राहून अनुभवता येणार आहे. 'महाराष्ट्र सरकारनं आम्हाला स्टेडियममध्ये  100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. आम्ही सध्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये टेस्ट सीरिजमध्ये निवड झालेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षण वर्गाचे यजमान आहोत. या वर्गाच्या निमित्तानं टेस्ट मॅचची देखील तयारी होणार आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पहिल्या टेस्टसाठी विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कॅप्टन आहे. चेतेश्वर पुजारा या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या चार प्रमुख खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर, मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) टेस्ट टीममध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीनं कसा साजरा केला साक्षीचा वाढदिवस? पाहा VIDEO टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा (व्हाईस कॅप्टन), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
  Published by:News18 Desk
  First published: