मुंबई टेस्ट सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला 3 मोठे धक्के बसले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) हे 3 प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे ही टेस्ट खेळू शकणार नाहीत. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) देखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो देखील या टेस्टमधून आऊट झाला आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीमध्ये टॉम लॅथम न्यूझीलंडची कॅप्टनसी करणार आहे. IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये बदलणार विराटचं नशीब, 741 दिवसांची प्रतीक्षा संपणार! वानखेडे स्टेडियमच्या पिचनं आजवर फास्ट बॉलर्सना नेहमीच मदत केली आहे. या पिचवर त्यांना बाऊन्स चांगला मिळतो. तर शेवटच्या दोन दिवसांमध्ये हे पिच स्पिन बॉलर्सना मदत करते, असा इतिहास आहे.UPDATE - Toss will take place at 11.30 AM. Match starts at 12 PM. 78 overs to be bowled.#INDvNZ @Paytm pic.twitter.com/c324ZF03ge
— BCCI (@BCCI) December 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, New zealand, Team india, Weather forcast