• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: धोनीच्या गावात टीम इंडियाचा रेकॉर्ड दमदार, मालिका जिंकण्यासाठी अशी असेल Playing11

IND vs NZ: धोनीच्या गावात टीम इंडियाचा रेकॉर्ड दमदार, मालिका जिंकण्यासाठी अशी असेल Playing11

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टी 20 (IND vs NZ 2nd T20I) मॅच शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) होम स्टेडियममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड दमदार आहे.

 • Share this:
  रांची, 19 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टी 20 (IND vs NZ 2nd T20I) मॅच शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे. या मॅचची सर्व तयारी झाली आहे. झारखंड उच्च न्यायालयाच्या या निर्णयानं या मॅचवरील संकट देखील दूर झालं आहे. तब्बल 4 वर्षांनी रांचीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच होत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) होम स्टेडियममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड दमदार आहे. रांचीच्या झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये (JSCA Stadium Ranchi) आजवर दोन टी 20 इंटरनॅशनल मॅच झाल्या असून या दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे. यापैकी पहिली मॅच 2016 साली श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) झाली होती. त्या मॅचमध्ये टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 196 रन काढले.त्याला उत्तर देताना श्रीलंकेला 9 आऊट 127 रनच करता आले. त्यामुळे टीम इंडियानं ही मॅच 69 रननं जिंकली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात (India vs Australia) 2017 साली झालेल्या मॅचला पावसाचा फटका बसला होता. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं 18.4 ओव्हर्समध्ये 8 आऊट 118 रन केले. त्यानंतर पाऊस सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी 6 ओव्हर्समध्ये 48 रनचं लक्ष्य मिळालं. ते लक्ष्य भारतीय टीमनं 5.3 ओव्हर्समध्ये 1 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. IND vs NZ: दुसऱ्या टी20 बाबत मोठी अपडेट, मॅच स्थगितीबाबत हायकोर्टानं दिला निर्णय टीम इंडियाची प्लेईंग 11 रांचीची मॅच जिंकून या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मॅचमध्ये अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) समावेश होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही टी20 वर्ल्ड कपमध्ये चहलची निवड झाली नव्हती. जयपूरमध्येही त्याच्या जागी अक्षर पटेलला खेळवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. जयपूरच्या मॅचमध्ये अक्षरनं 4 ओव्हर्समध्ये 31 रन दिले आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे रांचीमध्ये होणाऱ्या सामन्यात अक्षरच्या जागी चहलला संधी मिळू शकते. टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज
  Published by:News18 Desk
  First published: