मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध निर्णायक लढत आज, टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी

IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध निर्णायक लढत आज, टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी

भारतीय महिला टीमच्या इंग्लड दौऱ्यातील (IND W vs ENG W) शेवटचा सामना आज (14 जुलै) होणार आहे. हा सामना जिंकून या दौऱ्याचा शेवट गोड करण्याची संधी टीम इंडियाला आहे.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 14 जुलै : भारतीय महिला टीमच्या इंग्लड दौऱ्यातील (IND W vs ENG W) शेवटचा सामना आज (14 जुलै) होणार आहे. हा सामना जिंकून या दौऱ्याचा शेवट गोड करण्याची संधी टीम इंडियाला आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी 8 रनने विजय मिळवला होता. या विजयामुळे भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे या मालिकेचा फैसला आता बुधवारी रात्री होणाऱ्या सामन्यानंतर निश्चित होईल.

दुसऱ्या सामन्यात भारताने ठेवलेल्या 149 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 140 रनच करता आल्या. 14 ओव्हरमध्ये 2 आऊट 106  अशी इंग्लंडची भक्कम स्थिती होती, पण 20 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोअर 8 आऊट 140 एवढाच झाला. भारताकडून पूनम यादवने (Poonam Yadav) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. टीम इंडियाने या सामन्यात तब्बल 4 रन आऊट केले.

भारतीय टीमनं संपूर्ण दौऱ्यात चांगली फिल्डिंग केली आहे. शेवटच्या मॅचमध्ये देखील टीमकडून तशीच अपेक्षा असेल. भारताच्या ओपनर शफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी मागील मॅचमध्ये चांगली सुपुवात केली होती. या जोडूला मिडल ऑर्डरनं भक्कम साथ देणे आवश्यक आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौरसह दीप्ती शर्मा आणि हरलीन देओल यांना वेगाने रन काढवे लागतील.

स्पिनर्सवर पुन्हा मदार

टीम इंडियाची निर्णायक मॅचमध्ये देखील स्पिनर्सवर  पुन्हा एकदा मदार असेल. पूनम यादव, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा या त्रिकुटानं या मालिकेत चांगली बॉलिंग केली आहे. त्यांची जादू पुन्हा एकदा चालली तर भारताला ही मालिका 2-1 ने जिंकण्याची संधी आहे.

WTC 2023 : ICC कडून संपूर्ण कार्यक्रम जाहीर, पाहा टीम इंडियाचे वेळापत्रक

भारताची संभाव्य टीम : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेट किपर), स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव आणि राधा यादव

First published: