मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'तुझं लक्ष कुठं आहे?', पंतला विचारला विराटनं प्रश्न, रोहित शर्माही नाराज VIDEO

IND vs ENG : 'तुझं लक्ष कुठं आहे?', पंतला विचारला विराटनं प्रश्न, रोहित शर्माही नाराज VIDEO

चौथ्या दिवसाच्या शेवटी ऋषभ पंत खेळताना पाहून कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

चौथ्या दिवसाच्या शेवटी ऋषभ पंत खेळताना पाहून कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

चौथ्या दिवसाच्या शेवटी ऋषभ पंत खेळताना पाहून कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

लॉर्ड्स, 16 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्समध्ये सुरु असलेली टेस्ट (India vs England 2nd Test) जिंकण्याची टीम इंडियाची आशा अजूनही कायम आहे. अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) 61 आणि चेतेश्वर पुजाराचे 45 रन यांच्या मदतीनं टीम इंडियानं चौथ्या दिवसाच्या अखेरीस 6 आऊट 181 रन केले आहे. भारताकडं सध्या 154 रनची आघाडी आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) ही जोडी सध्या नाबाद आहे. चौथ्या दिवसाच्या शेवटी ऋषभ पंत खेळताना पाहून कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

रविंद्र जडेजा आऊट झाल्यानंतर पंत आणि इशांत शर्मा खेळत असताना हा सर्व प्रकार घडला. यावेळी विराट कोहली लॉर्ड्सच्या बाल्कनीतून पंतला सतत इशारा करत होता. सूर्यप्रकाश कमी झालेला असूनही पंत बॅटींग करत होता. विराट सातत्याने त्याबाबत खूण करत पंतला सांगत होता. 'तुझं लक्ष कुठं आहे?' असाच विराटच्या त्या  हावभावाचा अर्थ होता. फक्त विराटच नाही तर रोहित शर्मा देखील पंत अंधारात खेळत असल्यानं नाराज झाला होता. विराटनं अखेर हनुमा विहारीला मैदानात पाठवून पंतला निरोप दिला.

विराटचा निरोप मिळाल्यानंतर पंतनं अंपायरकडं अपूऱ्या सूर्यप्रकाशाबाबत तक्रार केली. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा पंत 14 तर इशांत 4 रन काढून खेळत होते. आता पाचव्या दिवशी या जोडीवरच टीम इंडियाची सारी भिस्त आहे.

IND vs ENG : आऊट झाल्यानंतर विराट स्वत:वर नाराज, लॉर्ड्सच्या बाल्कनीतील VIDEO VIRAL

रोहित झाला होता आऊट

लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी खराब सूर्यप्रकाशाचा फटका टीम इंडियाला बसला होता. रोहित शर्मा आऊट होण्याच्या एक ओव्हर आधी केएल राहुलनं (KL Rahul) अंधूक प्रकाशाची तक्रार अंपायरकडं केली होती. अंपायरनं तरीही खेळ सुरू ठेवला. त्यानंतर लगेच जेम्स अँडरसनच्या आतमध्ये येणाऱ्या बॉलवर रोहित आऊट झाला. चौथ्या दिवशी ऋषभ पंतच्या बाबतीत तो प्रकार घडू नये म्हणूनच विराटनं हस्तक्षेप करत त्याला खेळ थांबवण्याची सूचना केली.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england