मुंबई, 29 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या टेस्टला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाला गेल्या काही इंग्लंड दौऱ्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे आगामी मालिका कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) महत्त्वाची आहे. या मालिकेपूर्वी विराट अडचणीत सापडला आहे. क्रिकेटच्या मैदानातील नाही तर मैदानाबाहेरच्या कृत्यामुळे विराटसमोर डोकेदुखी निर्माण झाली आहे.
विराट कोहली सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे वादात अडकलायं. कोहलीनं खासगी विद्यापीठाच्या (Private University) प्रसिद्धीसाठी पोस्ट टाकताना त्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंचा (Tokyo Olympics 2020) उल्लेख केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाली असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. सोशल मीडिया युझर्सही कोहलीला या पोस्टवरून ट्रोल करत आहेत . या पोसमध्ये अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (ASCI) नियमांचं उल्लंघन झाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. त्यामुळे एएससीआय कोहलीला या प्रकरणी नोटीस पाठवू शकते.
मीडियाच्या वृत्तानुसार विराट कोहलहीने टाकलेल्या पोस्टवर अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) या जाहिरात जगतातील आघाडीच्या संस्थेनं आक्षेप घेतला आहे. या संस्थेने जाहिरातीतील मजकूर, पद्धत याबद्दल अनेक नियम घालून दिले आहेत. भारतातील जाहिरात कंपन्या या नियमांचं पालन करतात. नियमांचं उल्लंघन झाल्यास या संस्थेकडे दाद मागता येते. तसंच ही संस्थाही जाहिरातींवर लक्ष ठेवून असते. या संस्थेकडून लवकरच कोहली याला नोटीस पाठवली जाऊ शकते. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार कोहलीची पोस्ट अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) या संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत आहे.
विराटच्या पोस्टमध्ये नेमकं काय ?
सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली याने म्हटलंय, ‘काय रेकॉर्ड आहे. भारतातील 10 टक्के ऑलिम्पिक खेळाडू लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतून (Lovely Professional University) शिकले आहेत. मला आशा आहे की एलपीयू (LPU) लवकरच आपल्या विद्यार्थ्यांना भारतीय क्रिकेट संघातही पाठवेल. जय हिंद.’
IND vs ENG: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत मोठी अपडेट!
ASCI च्या मार्गदर्शन तत्वानुसार या पोस्टमध्ये कोणताही डिस्क्लेमर (Disclaimer) दिलेला नाही. याचाच अर्थ विराटने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट म्हणजे एक पेड प्रमोशन आहे. परंतु याबाबत कोणतीही माहिती विराटने आपल्या पोस्टमध्ये दिलेली नाही. विराट कोहलीच्या या पोस्टवर ASCI च्या अधिकाऱ्यांचे मत आहे की, ‘आम्ही या प्रकरणाबाबत विचार विनिमय करीत असून लवकरच कोहलीकडून याचे उत्तर मागविण्यात येईल.’ दरम्यान, विराट कोहली सध्या इंग्लंडमधील डरहॅममध्ये असून तो टीम इंडियाबरोबर टेस्ट क्रिकेट मालिकेसाठी तयारी करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Virat kohli