लॉर्ड्स, 16 ऑगस्ट : क्रिकेट विश्वातील दिग्गज बॅट्समन असलेला विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मात आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. त्यानंतर लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही अर्धशतक झळकावण्यात विराटला अपयश आले. दुसऱ्या इनिंगमध्ये राहुल-रोहित आऊट झाल्यानंतर विराटकडून मोठी अपेक्षा होती. पण, यावेळी देखील विराट अपयशी ठरला. त्याला 20 रनवर सॅम करननं (Sam Curran) आऊट केलं.
विराट कोहली आऊट होऊन परतल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट स्वत:वर नाराज झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतरही विराट रागातच होता. लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या विराटनं टिश्यू पेपर फेकत स्वत:वरील नाराजी व्यक्त केली. विराटचा चेहरा यावेळी पूर्ण उतरलेला होता.
Time for redemption in next test.🔥#ENGvsIND @imVkohli
pic.twitter.com/hRzMk5asmv — CHIKU (@KohliisGoat) August 15, 2021
सॅम करनने ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या बॉलवर विराट कोहली शॉट खेळायला गेला, पण तो बॉल बॅटला लागून विकेट कीपर जॉस बटलरच्या (Jos Butller) हातात बॉल गेला.ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल खेळताना इंग्लंडने पुन्हा एकदा विराटला जाळ्यात अडकवले.
इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंग!, लॉर्ड्सवरून समोर आला धक्कादायक VIDEO
विराट कोहलीसाठी ऐकेकाळी शतक लगावणे ही अगदी सहज गोष्ट आहे. पण, गेल्या दोन वर्षांमध्ये त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही. विराटनं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध झळकावले होते. कोलकातामध्ये झालेल्या त्या डे-नाईट टेस्टमध्ये विराटनं 136 रन काढले होते. या शतकानंतर विराटनं तीन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 48 इनिंगमध्ये 1745 रन काढले. यामध्ये 17 अर्धशतकाचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Virat kohli