Home /News /sport /

IND vs ENG : पहिल्या टेस्टनंतर विराट-अजिंक्यनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन!

IND vs ENG : पहिल्या टेस्टनंतर विराट-अजिंक्यनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन!

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिली टेस्ट (IND vs ENG 1st Test) पावसामुळे ड्रॉ झाली.या मॅचमध्ये भारतीय टीम विजयाच्या उंबरठ्यावर होती. तरीही विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी टीम मॅनेजमेंटला चांगलंच टेन्शन दिलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिली टेस्ट (IND vs ENG 1st Test) पावसामुळे ड्रॉ झाली. पाचव्या दिवशी पावसामुळे काहीही खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाचं विजयाचं स्वप्न विरलं. या मॅचमध्ये भारतीय टीम विजयाच्या उंबरठ्यावर होती. तरीही विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी टीम मॅनेजमेंटला चांगलंच टेन्शन दिलं आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी जोरदार कामगिरी केली. इंग्लंडची पहिली इनिंग 183 रनवर संपुष्टात आली. त्यानंतर टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रन काढले. इंग्लडनं दुसऱ्या इनिंगमध्ये 303 पर्यंत मजल मारली. भारतासमोर विजयासाठी 209 रनचं लक्ष्य होतं. चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत भारतीय टीमनं 1 आऊट 52 रन केले. भारतीय टीमला शेवटच्या दिवशी विजयासाठी फक्त 152 रनची आवश्यकता होती. पावसामुळे भारताच्या हातातून विजय निसटला. पण पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे दोघंही अपयशी ठरले. विराट कोहली गोल्डन डकवर परतला. तर रहाणे 5 रन काढून रन आऊट झाला. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं 2019 साली बांगलादेश विरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर 15 इनिंगमध्ये त्याला शतक करण्यात अपयश आले आहे. यापैकी 6 वेळा तर त्याला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नसून 3 वेळा तो शून्यावर आऊट झाला आहे. कोहलीचा हा खराब फॉर्म टीम इंडियाच्या काळजीचा विषय आहे. IPL 2021 : दुसऱ्या टप्प्यात कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळलं तर काय होणार? वाचा BCCI चे नियम अजिंक्य रहाणे देखील पहिल्या इनिंगमध्ये अपयशी ठरला. तो 5 बॉलमध्ये 5 रन काढून रन आऊट झाला. रहाणे सध्या खराब फॉर्मममध्ये आहे. त्यामुळे त्याच्या टीममधील जागेवर प्रश्न उपस्थित झाले आहे. टेस्ट क्रिकेटमधील मागील 13 इनिंगमध्ये शतक झळकावण्यात त्याला अपयश आले आहे. रहाणेनं शेवटचं शतक डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले होते. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तो फार प्रभाव टाकू शकला नाही. 6 इनिंगमध्ये त्याचा सर्वश्रेष्ठ स्कोअर हा 67 होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या