• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : इंग्लंडमध्ये दाखल होताच सूर्या लागला कामाला, अँडरसनचा सामना करण्याची तयारी सुरू

IND vs ENG : इंग्लंडमध्ये दाखल होताच सूर्या लागला कामाला, अँडरसनचा सामना करण्याची तयारी सुरू

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात बदली खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) निवड झाली आहे. त्याने क्वारंटाईन कालावधीमध्येच जेम्स अँडरसनच्या बॉलिंगचा अभ्यास सुरू केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 8 ऑगस्ट:  इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात बदली खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या दोघांची निवड झाली आहे. शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे या मालिकेतून आऊट झाल्यानं त्यांना टीममध्ये बॅकअप म्हणून निवडलं आहे. हे दोघेही श्रीलंका दौऱ्याानंतर लगेच इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. सूर्यकुमार आणि पृथ्वी हे दोघेही सध्या इंग्लंडमधील हॉटेलमध्ये आवश्यक असलेला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ते दोघं टीममध्ये दाखल होतील. पहिल्या दोन टेस्टसाठी हे दोघंही उपलब्ध नसले तरी सूर्यकुमारनं क्वारंटाईन कालावधीमध्येच तयारी सुरु केली आहे. सूर्यकुमारनं वर्कआऊट करण्यासाठी एक खास सेटअप केला आहे. सूर्यकुमारनं व्यायाम करण्यासाठी असलेल्या बाईकच्या पुढे टॅब लावला आहे. त्या टॅबमध्ये तो नॉटिंघममध्ये सुरु असलेली टेस्ट मॅच वर्क आऊट करत असतानाही लाईव्ह पाहू शकतो. त्याने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला परफेक्ट सेटींग असे नाव दिले आहे. सूर्यकुमारला या दौऱ्यात टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली तर जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड या अनुभवी बॉलर्सचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या दोघांच्या बॉलिंगचा अभ्यास त्यानं क्वारंटाईन कालावधीमध्येच सुरू केला आहे. Tokyo Olympics : नीरज चोप्राला धोनीच्या टीमचा सलाम, मोठ्या बक्षिसासह करणार खास सन्मान सूर्यकुमारनं यावर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानं आत्तापर्यंत तीन वन-डे आणि चार आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. या दोन्ही प्रकारात प्रभावी कामगिरी केल्यानंच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. सूर्यानं वन-डे क्रिकेटमध्ये 62 च्या सरासरीनं 124 तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 46.63 च्या सरासरीनं 139 रन काढले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: