• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Twitter च्या मैदानात शमीच्या यॉर्करवर ऋषभ पंत क्लीन बोल्ड! जाणून घ्या काय आहे प्रकरण

Twitter च्या मैदानात शमीच्या यॉर्करवर ऋषभ पंत क्लीन बोल्ड! जाणून घ्या काय आहे प्रकरण

क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी टीमची भंबेरी उडवणारा मोहम्मद शमी (Mohammed Shami) सोशल मीडियावर देखील तितकाच भेदक आहे. त्याच्या ट्विटनं ऋषभ पंत (Rishabh Pant) क्लीन बोल्ड झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 5 सप्टेंबर :  टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) 3 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. शमीनं ओव्हल टेस्टच्या दरम्यान क्रिकेट फॅन्ससोबत केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याचा टीम इंडियातील सहकारी ऋषभ पंत (Rishabh Pant) याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी केलेलं ट्विट चांगलंच व्हायरल झालं होतं. पंतनं शमीला शुभेच्छा देताना, ' शमी भाई, बॉल आणि वय दोन्ही गोष्टी वेगानं निघून जात आहेत.' असं खोडकर ट्विट केलं होतं. या ट्विटला पंतनं हसण्याच्या इमोजी वापरत शमीला शुभेच्छा देतानाच त्याची फिरकी घेतल असल्याचं दाखवून दिलं होतं. आता मोहम्मद शमीनंही ट्विटरच्या द्वारेच एक यॉर्कर टाकत पंतला क्लीन बोल्ड केले. 'आपलीही वेळ येईल बेटा. बॉल आणि वय कुणीही थांबवू शकत नाही. पण हो लठ्ठपणावर इलाज आजही होतो.' असं ट्विट केलं आहे. शमीचं हे उत्तर आता चांगलंच व्हायरल झालं आहे. IND vs ENG: रोहित शर्माचे 3 वर्षांपूर्वीचे Tweet Viral, 'या' दिवसाची केली होती भविष्यवाणी यापूर्वी ऋषभ पंतला त्यानं शमीला उद्देशून केलेल्या ट्विटबद्दल फॅन्सनी चांगलेच ट्रोल केले होते. 'तुझाही वेळ निघून जात आहे. याच पद्धतीनं फेल झालास तर तुझी जागा दुसरं कुणी तरी घेईल.' उत्तर त्याला क्रिकेट फॅन्सनी दिलं होतं. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंत अपयशी ठरला आहे. त्यानं या सीरिजमध्ये आत्तापर्यंत 6 इनिंगमध्ये 16 च्या सरासरीनं 173 रन केले आहेत.  37 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर असून एकही अर्धशतक त्याला अद्याप झळकावता आलेलं नाही.
  Published by:News18 Desk
  First published: