IND vs ENG: टेस्ट सीरिजपूर्वी टीम इंडियाची पहिल्यांदाच प्रॅक्टिस, पाहा PHOTOS

IND vs ENG: टेस्ट सीरिजपूर्वी टीम इंडियाची पहिल्यांदाच प्रॅक्टिस, पाहा PHOTOS

ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीमनं (Team India) इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) टेस्ट सीरिज जिंकण्याची तयारी सुरु केली आहे.

  • Share this:

चेन्नई, 2 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीमनं (Team India) इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) टेस्ट सीरिज जिंकण्याची तयारी सुरु केली आहे. भारताचे सर्व खेळाडू 6 दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी चेन्नईच्या चेपॉक मैदानात उतरले. यापूर्वी झालेल्या तिन्ही कोरोना टेस्टमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह सर्व खेळाडू मैदानात उतरले होते. सहा दिवसांच्या ब्रेकनंतर त्यांनी सुरुवातीला व्यायाम केला. आता ते बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगचं कौशल्य वाढवण्याचा सराव करतील. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI)  टीम इंडियाच्या प्रॅक्टीसचे फोटो ट्वीट केले असून ते चांगलेच व्हायरल (Viral) झाले आहेत.

दुदुऱ्या टेस्टपासून प्रेक्षकांची उपस्थिती

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. सीरिजच्या पहिल्या दोन टेस्ट चेन्नईमध्ये (M.A.Chidambaram Stadium) खेळवण्यात येणार आहेत, तर उरलेल्या दोन टेस्ट अहमदाबादमध्ये होतीस. वर्षभरानंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होत आहे. सोबतच आता स्टेडियममध्ये प्रेक्षकही दिसू शकतील. दुसऱ्या टेस्टपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळू शकतो. केंद्र सरकारने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यानुसार खेळाच्या ठिकाणी 50 टक्के प्रेक्षकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बीसीसीआय (BCCI) आणि तामिळनाडू क्रिकेट संघाने याआधीही प्रेक्षकांना मैदानात येऊन देण्याची मागणी केली होती. पण नंतर प्रेक्षकांशिवायच पहिले दोन सामने होतील, असं सांगण्यात आलं. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे दुसऱ्या टेस्टपासून स्टेडियममध्ये प्रेक्षक दिसू शकतात.

भारत – इंग्लंड सीरिजचा रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजवर 122 टेस्ट झाल्या आहेत. भारतानं त्यापैकी फक्त 26 टेस्ट जिंकल्या असून 47 टेस्ट गमावल्या आहेत. 49 टेस्ट ड्रॉ झाल्या. भारतामध्ये यापैकी 60 टेस्ट झाल्या असून घरच्या मैदानावर 19 विजय, 13 पराभव आणि 28 ड्रॉ असा टीम इंडियाचा रेकॉर्ड आहे.

Published by: News18 Desk
First published: February 2, 2021, 2:51 PM IST

ताज्या बातम्या