मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: नीरजनं संपवली 121 वर्षांची प्रतीक्षा, आता 89 वर्षांनी टीम इंडिया करणार इतिहास

IND vs ENG: नीरजनं संपवली 121 वर्षांची प्रतीक्षा, आता 89 वर्षांनी टीम इंडिया करणार इतिहास

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं टोकोयो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचवेळी टीम इंडियाला 89 वर्षांनी इतिहास घडवण्याची संधी आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑगस्ट : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं टोकोयो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 121 वर्षांच्या इतिहासात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज हा पहिला भारतीय अ‍ॅथलिट ठरला आहे. ऑलिम्पिकमधील या कामगिरीनंतर सर्व देश सध्या आनंदात आहे. त्याचवेळी क्रिकेटच्या मैदानातील 89 वर्षांची प्रतीक्षा रविवारी संपण्याची शक्यता आहे.

टीम इंडियानं 5 टेस्ट मॅचच्या मालिकेची सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी (IND vs ENG) टीम इंडियाला विजयासाठी 157 रनची आवश्यकता होती. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 278 रन केले होते. तर दुसऱ्या इनिंगमध्ये जिंकण्यासाठी 209 रनचं लक्ष्य मिळालं आहे. त्याला उत्तर देताना चौथ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाचा स्कोअर 1 आऊट 52 आहे.

89 वर्षांनी इतिहास घडणार

टीम इंडिया 1932 पासून इंग्लंडमध्ये टेस्ट खेळत आहे. ही भारतीय क्रिकेट टीमची इंग्लंडमधील 63 वी टेस्ट आहे. यापैकी फक्त 7 टेस्ट टीमनं जिंकल्या आहेत. 34 टेस्ट हरल्या असून 21 ड्रॉ झाल्या आहेत. आता या सीरिजमधील पहिली टेस्ट जिंकून आघाडी घेण्याची टीम इंडियाला संधी आहे.

Tokyo Olympics : नीरज चोप्रानं पूर्ण केली मिल्खा सिंग यांची इच्छा, मुलानं दिली भावुक प्रतिक्रिया

टीम इंडियानं इंग्लंडमधील 7 मैदानात आजवर टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यापैकी एकाही टेस्टमध्ये टीमचा रेकॉर्ड चांगला नाही. टीम इंडियानं पहिली टेस्ट जिंकली तर नॉटिंघमच्या मैदनातील हा तिसरा विजय असेल. या ठिकाणी आजवर 2 टेस्टमध्ये भारतीय टीम पराभूत झाली असून 3 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. या मैदानावर भारतीय टीमनं पराभवापेक्षा जास्त टेस्ट जिंकण्याचा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. इंग्लंडच्या कोणत्याही मैदानावर भारतीय टीमला हा रेकॉर्ड करता आलेला नाही. त्यामुळे नीरज चोप्रानं जपानमध्ये केलेल्या विक्रमानंतर 24 तासांनी टीम इंडियालाही इंग्लंडमध्ये रेकॉर्ड करण्याची संधी आता चालून आली आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, Olympics 2021