Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडियात बदल नक्की, ओव्हल टेस्ट जिंकून देणाऱ्या बॉलरला विराट करणार बाहेर

IND vs ENG : टीम इंडियात बदल नक्की, ओव्हल टेस्ट जिंकून देणाऱ्या बॉलरला विराट करणार बाहेर

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या 5 टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 नं आघाडीवर आहे. आता या सीरिजमधील पाचव्या आणि शेवटच्या टेस्टसाठी टीम इंडियात बदल होणार आहे.

    मँचेस्टर, 8 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या 5 टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 नं आघाडीवर आहे. ओव्हलमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये (IND vs ENG, 4 th test) भारतीय टीमनं 157 रननं विजय मिळवला. या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी जोरदार कामगिरी केल्यामुळेच पाचव्या दिवशी टीमला विजय मिळवता आला. आता पाचव्या टेस्टसाठी टीममध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विराट कोहली विश्रांती देण्याची शक्यता आहे. बुमराहनं या सीरिजमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहनं या सीरिजमध्ये सर्वाधिक 151 ओव्हर बॉलिंग केली आहे. अन्य कोणत्याही बॉलरनं 130 ओव्हर बॉलिंग केलेली नाही. यामध्ये त्यानं 21 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या टेस्टमध्ये मोहम्मद शमी खेळला नव्हता. त्यामुळे पाचव्या टेस्टमध्ये बुमराहला विश्रांती देऊन शमीचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. शमीनं या सीरिजमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर लॉर्ड्स टेस्टमध्ये नाबाद  56 रनची महत्त्वपूर्ण भागिदारी केली आहे. इंग्लंडमध्ये मोठे बदल भारताविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडने टीममध्ये मोठे बदल केले आहेत. विकेट कीपर बॅट्समन जॉस बटलर (Jos Buttler) आणि स्पिन बॉलर जॅक लीच (Jack Leach) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. लीचने या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 18 विकेट घेतल्या होत्या. IND vs ENG: .... आणि म्हणून मोहम्मद कैफनं केला नागीण डान्स, VIDEO VIRAL इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. सॅम बिलिंग्सला (Sam Billings) पुन्हा एकदा त्याची काऊंटी टीम केंटमध्ये पाठवण्यात आलं आहे. चौथ्या टेस्टसाठी बिलिंग्सचा इंग्लंडच्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. जॉस बटलरची पत्नी बाळाला जन्म देणार असल्यामुळे त्याने चौथ्या टेस्टमधून माघार घेतली होती. आता त्याचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये सुरु होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या