Home /News /sport /

IND vs ENG: अखेर ठरलं! 2 मुंबईकर होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा

IND vs ENG: अखेर ठरलं! 2 मुंबईकर होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा

इंग्लंड दौऱ्यात जखमी झालेल्या खेळाडूंची जागा घेण्यासाठी दोन मुंबईकर इंग्लंडला रवाना होणार आहेत. भारतीय निवड समितीनं (Team India Selection Committee) याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

    मुंबई, 26 जुलै: इंग्लंड दौऱ्यात जखमी झालेल्या खेळाडूंची जागा घेण्यासाठी ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मिडल ऑर्डर बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोन मुंबईकर इंग्लंडला जाणार आहेत. भारतीय निवड समितीनं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यातील तीन खेळाडू जखमी झाल्यानंतर या दोघांना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात येणार आहे.  इंग्लंड दौऱ्यावरील शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन खेळाडू जखमी झाल्यानं इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमधून बाहेर झाले आहेत. त्यानंतर या खेळाडूंची मागणी टीम मॅनेजमेंटनं केली होती. त्यानंतर ती मागणी मान्य करण्यात आली आहे. शुभमन गिल जखमी झाल्यानंतर लगेच टीम इंडियानं पृथ्वी शॉची मागणी केली होती. त्यावेळी निवड समितीनं नकार दिला होता. आता जखमी खेळाडूंची संख्या वाढल्यानं निवड समितीला ही मागणी मान्य करावी लागली. सूर्यकुमार यादवनं याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेत चांगली  कामगिरी केल्यानंतर त्यानं श्रीलंका विरुद्धच्या वन-डे मालिकेतही दमदार प्रदर्शन केलं आहे. याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली आहे. खराब कामगिरीनंतरही हार्दिक पांड्या हिट, 'या' कारणामुळे जिंकलं फॅन्सचं मन! VIDEO पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे दोघंही सध्या श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाचे सदस्य आहेत. रविवारी झालेल्या पहिल्या टी20 सामन्यातही ते खेळले होते. आता ते लवकरात लवकर इंग्लंडला रवाना होणार आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 4 ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Prithvi Shaw, Suryakumar yadav

    पुढील बातम्या