Home /News /sport /

IND vs ENG : 'टीम इंडियाकडून खेळण्यासाठी अश्विनची जडेजाशी नाही तर या ऑल राऊंडरशी आहे स्पर्धा'

IND vs ENG : 'टीम इंडियाकडून खेळण्यासाठी अश्विनची जडेजाशी नाही तर या ऑल राऊंडरशी आहे स्पर्धा'

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England Nottingham Test) यांच्यातील नॉटिंघम टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीनं (Virat Kohli) प्लेईंग 11 ची घोषणा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.

    मुंबई, 9 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England Nottingham Test) यांच्यातील नॉटिंघम टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीनं (Virat Kohli) प्लेईंग 11 ची घोषणा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. या टीममध्ये दिग्गज भारतीय स्पिनर आर. अश्विनचा (R. Ashwin) समावेश नव्हता. अश्विननं इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वी इंग्लिश कौंटी स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याने सरेकडून खेळताना एका मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीनंतरही त्याला अंतिम 11 मध्ये जागा मिळाली नाही. अश्विनच्या ऐवजी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना संधी मिळाली. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली. या टेस्टमध्ये जडेजाला एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्यानं अर्धशतक झळकावलं. त्याच्या या कामगिरीनंतर पुढील सीरिजमध्ये अश्विनला टीममध्ये संधी मिळणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 'अश्विनची अंतिम 11 मधील जागेसाठी जडेजाशी नाही तर नॉटिंघम टेस्टमध्ये 4 विकेट्स घेणारा बॉलिंग ऑल राऊंडर शार्दुल ठाकूरशी स्पर्धा आहे,' असं मत माजी भारतीय विकेटकिपर दीप दासगुप्तानं व्यक्त केलं आहे. दासगुप्तानं बीबीसीच्या टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टमध्ये सांगितले की, 'अनेक जण जडेजा आणि अश्विनमधील स्पर्धेबाबत प्रश्न विचारत आहेत. मला तसं वाटत नाही. टीममध्ये जागा मिळवण्यासाठी खरी स्पर्धा शार्दुल आणि अश्विनबाबत आहे. यामध्ये कुणाला खेळवायची याची रणनीती टीम मॅनेजमेंटला निश्चित करावी लागेल. 128 वर्षांनतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? BCCI नं दिलं 'हे' उत्तर जडेजाची  'या' खेळाडूशी स्पर्धा 'रविंद्र जडेजाची स्पर्धा ही हनुमा विहारीशी आहे. या दोघांपैकी सहाव्या क्रमांकावर कुणाला खेळवायचं याचा निर्णय टीम मॅनेजमेंटला घ्यायचा आहे,' असे दासगुप्ताने स्पष्ट केले. लॉर्ड्सवर 12 ऑगस्टपासून दुसरी टेस्ट सुरु होत आहे. त्यामध्ये टीम इंडियामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा अंदाज दासगुप्ताने व्यक्त केला. लॉर्ड्स टेस्टसाठी भारतीय टीममध्ये काही बदल झाला तर मला आश्चर्य वाटेल, असे त्याने सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, R ashwin, Ravindra jadeja

    पुढील बातम्या