मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: टीम इंडियात होणार अश्विनचं पुनरागमन! 'या' खेळाडूची घेणार जागा

IND vs ENG: टीम इंडियात होणार अश्विनचं पुनरागमन! 'या' खेळाडूची घेणार जागा

टीम इंडियानं (Team India) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडवर 1-0 नं आघाडी घेतली आहे. 25 ऑगस्टपासून या सीरिजमधील तिसरी टेस्ट सुरू होणार आहे.

टीम इंडियानं (Team India) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडवर 1-0 नं आघाडी घेतली आहे. 25 ऑगस्टपासून या सीरिजमधील तिसरी टेस्ट सुरू होणार आहे.

टीम इंडियानं (Team India) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडवर 1-0 नं आघाडी घेतली आहे. 25 ऑगस्टपासून या सीरिजमधील तिसरी टेस्ट सुरू होणार आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 21 ऑगस्ट : टीम इंडियानं (Team India) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडवर 1-0 नं आघाडी घेतली आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर भारतीय टीमनं लॉर्ड्सवर 151 रननं विजय मिळवला. आता तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून होणार आहे. दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाचा प्रमुख स्पिनर आर. अश्विनला (R. Ashwin) अद्याप एकाही टेस्टमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे विराटला प्रश्न विचारले जात आहेत. विराटच्या जागी टीम मॅनेजमेंटनं रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संधी दिली आहे. जडेजानं या मालिकेत चांगली बॅटिंग केली असली तरी बॉलिंगनं निराश केलं आहे. त्यानं  44 ओव्हर बॉलिंग केली. पण त्याला एकही विकेट मिळालेली नाही. लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी विजय मिळवून दिला. तिथंही जडेजा संघर्ष करत होता. त्यामुळे लीडस टेस्टमध्ये अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. रविंद्र जडेजानं इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. तर आर. अश्विननं न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसंच सरेकडून कौंटी मॅच खेळताना 7 विकेट्स घेत त्याचा फॉर्म सिद्ध केला होता. त्यामुळे जडेजाच्या जागी अनुभवी अश्विनला टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते. तालिबानचा क्रिकेटला फटका, पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय! अफगाणिस्तानकडं केली 'ही' मागणी हेंडिग्लेमध्ये भारताचा जबरदस्त रेकॉर्ड भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) हेडिंग्लेमध्ये होणार आहे. या मैदानात भारतीय टीम गेल्या 54 वर्षात भारतानं  एकही टेस्ट हरलेली नाही. भारतीय टीमनं इथं आजवर 6 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यामध्ये 2 सामन्यात विजय मिळवला असून 3 मध्ये पराभव झाला आहे. पण हेडिंग्लेमधील मागील दोन्ही टेस्ट टीम इंडियानं जिंकल्या आहेत. या मैदानावर भारतीय टीमचा शेवटचा पराभव 1967 साली झाला होता.  1986 साली झालेल्या टेस्टमध्ये भारतानं इंग्लंडचा 279 रननं पराभव केला होता. त्यानंतर 2002 साली टीम इंडियानं हेडिंग्ले टेस्ट 1 इनिंग आणि 46 रननं जिंकली होती. भारताची संभाव्य 11 : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, इशांत शर्मा/रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
First published:

Tags: Cricket news, India vs england

पुढील बातम्या