मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : मालिका सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडला धक्का, प्रमुख बॅट्समन दुखापतीमुळे आऊट

IND vs ENG : मालिका सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडला धक्का, प्रमुख बॅट्समन दुखापतीमुळे आऊट

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट शुक्रवारपासून चेन्नईमध्ये सुरु होत आहे. इंग्लंड टीमच्या मालिका जिंकण्याच्या निर्धाराला पहिल्या टेस्टचा पहिला बॉल पडण्यापूर्वीच धक्का बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 4 फेब्रुवारी :  भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट शुक्रवारपासून चेन्नईमध्ये सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (World Test Championship) फायनल खेळण्यासाठी इंग्लंडला ही मालिका मोठ्या फरकानं जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंड टीमच्या मालिका जिंकण्याच्या निर्धाराला पहिल्या टेस्टचा पहिला बॉल पडण्यापूर्वीच धक्का बसला आहे.

इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉले  (Zak Crawley) मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या दोन टेस्टमधून बाहेर झाला आहे. क्रॉले याचा बुधवारीच 23 वा वाढदिवस झाला. त्याच दिवशी हॉटेलातील संगमरवरी फरशीवरुन घसरुन पडल्यानं तो दुखापतग्रस्त झाला. क्रॉलेचे मेडिकल रिपोर्ट रात्री उशीरा मिळाले. त्यामध्ये त्याला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आमची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर आगामी काही आठवडे उपचार करेल अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB)  दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चार टेस्ट मॅचची मालिका होणार असून यापैकी पहिल्या दोन टेस्ट या चेन्नईमध्ये होणार आहेत.

ओली पोप टीममध्ये दाखल

इंग्लंडचा मिडल ऑर्डरमधील बॅट्समन ओली पोप त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानं बुधवारी टीममध्ये दाखल झाला आहे. 23 वर्षाचा ओली मागच्या वर्षी पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये फिल्डिंग करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या खांद्याचं हाड मोडलं होतं. त्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं. तो इंग्लंडच्या टीममबरोबर श्रीलंकेत आला होता, पण टीमचा भाग नव्हता.

इंग्लंड समोर अवघड आव्हान

ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिज जिंकून परतलेल्या यजमान भारताला मोठ्या फरकानं हरवण्याचं आव्हान इंग्लंड समोर आहे. यापूर्वी भारतामध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडचा 4-0 असा पराभव झाला होता. आता जून महिन्यात लॉर्ड्सवर होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळायची असेल तर इंग्लंडसमोर ही सीरिज 3-0,3-1 किंवा 4-0 नं जिंकावी लागणार आहे.

First published:

Tags: Cricket