मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराटला जाळ्यात कसं अडकवलं? इंग्लंडच्या बॉलरनं सांगितलं रहस्य!

IND vs ENG : विराटला जाळ्यात कसं अडकवलं? इंग्लंडच्या बॉलरनं सांगितलं रहस्य!

लॉर्ड्स टेस्टमध्ये मोठ्या खेळीचं स्वप्न दाखवलेल्या विराटला (Virat Kohli) अर्धशतक झळकावण्यातही अपयश आलं. ओली रॉबिन्सननं (Ollie Robinson) त्याला आऊट केलं.

लॉर्ड्स टेस्टमध्ये मोठ्या खेळीचं स्वप्न दाखवलेल्या विराटला (Virat Kohli) अर्धशतक झळकावण्यातही अपयश आलं. ओली रॉबिन्सननं (Ollie Robinson) त्याला आऊट केलं.

लॉर्ड्स टेस्टमध्ये मोठ्या खेळीचं स्वप्न दाखवलेल्या विराटला (Virat Kohli) अर्धशतक झळकावण्यातही अपयश आलं. ओली रॉबिन्सननं (Ollie Robinson) त्याला आऊट केलं.

    लॉर्ड्स, 13 ऑगस्ट : केएल राहुलचं (KL Rahul) शतक आणि रोहित शर्माचं (Rohit Sharma) अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टच्या (India vs England 2nd Test) पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलं. राहुल, रोहितनं चांगला खेळ केल्यानं आनंदी असलेल्या टीम इंडियाच्या फॅन्सना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहलीनं (Virat Kohli) निराश केलं. पुजारा फक्त 9 रन काढून आऊट झाला. तर मोठ्या खेळीचं स्वप्न दाखवलेल्या विराटला अर्धशतक झळकावण्यातही अपयश आलं. ओली रॉबिन्सननं (Ollie Robinson) विराट कोहलीला आऊट केलं. विराटला जाळ्यात अडकवण्यासाठी काय प्लॅन केला होता, याचा खुलासा रॉबिन्सननं पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर केला आहे. माझी सर्वात मोठी विकेट! रॉबिन्सनचा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल खेळण्याचा विराटचा प्रयत्न फसला. त्याच्या बॅटला लागलेला बॉल इंग्लंडचा कॅप्टन जो रूटच्या (Joe Root) हाती विसावला. विराटची विकेट मिळाल्यानं रॉबिन्सनच भलताच आनंदी झाला आहे. 'विराटची विकेट ही माझी आजवरची सर्वात मोठी विकेट आहे. मी त्यामुळे खूप आनंदी आहे. तो मोठा क्षण होता. आम्ही त्याच्यासाठी खास योजना आखली होती. त्याला चौथ्या आणि पाचव्या स्टंपवर बॉलिंग करण्याची आमची योजना होती. सुदैवानं आम्ही त्यात यशस्वी ठरलो,' असे रॉबिन्सननं सांगितलं. रॉबिन्सननं यावेळी भारतीय बॅट्समनची प्रशंसा केली. मात्र त्याचवेळी नशिबानं इंग्लंडच्या बॉलर्सना साथ मिळाली नसल्याचं सांगितलं. 'अन्य एखाद्या दिवशी आम्हाला आणखी दोन-तीन विकेट्स मिळाल्या असत्या. आम्ही परिस्थितीचा वेगळा अंदाज केला होता. सुरुवातीला लवकर विकेट्स मिळतील असं आम्हाला वाटले होते. माझ्या मते आम्ही चांगली बॉलिंग केली,' असे रॉबिन्सनने स्पष्ट केले. IND vs ENG : लॉर्ड्सशी नातं सांगणारे Photos गांगुलीनं केले शेअर, दादाच्या कॅप्शननं जिंकलं फॅन्सचं मन राहुल आणि विराट कोहली जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 117 रनची भागिदारी केली. ओली रॉबिन्सननं विराट कोहलीला 42 रनवर आऊट करत ही जोडी फोडली. विराट आऊट झाल्यानंतर राहुल आणि अजिंक्य राहाणेनं अधिक पडझड होऊ न देता उर्वरित खेळ खेळून काढला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 2 विकेट्स घेतल्या. तर ओली रॉबिन्सननं एक विकेट घेतली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या