मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट का ठेवलं? सिराजनं सांगितलं कारण

IND vs ENG : विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट का ठेवलं? सिराजनं सांगितलं कारण

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये कमाल बॉलिंग केली आहे. सिराजनं तिसऱ्या दिवशी केलेल्या सेलिब्रेशननं सर्वांचं लक्ष वेधलं. त्याने खेळ संपल्यानंतर याचं कारण सांगितलं.

  लॉर्ड्स, 15 ऑगस्ट :  टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj)  इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये कमाल बॉलिंग केली आहे. सिराज आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांच्या बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियानं यजमानांना 391 रनवर रोखलं. इशांतनं 3 तर सिराजनं 4 विकेट्स घेतल्या. सिराजनं तिसऱ्या दिवशी केलेल्या सेलिब्रेशननं सर्वांचं लक्ष वेधलं. त्याने खेळ संपल्यानंतर याचं कारण सांगितलं. 'माझं हे सेलिब्रेशन विरोधकांसाठी आहे. जे माझ्याबद्दल काहीही बोलतात. आता माझी बॉलिंग त्यांना उत्तर देणार आहे. ही माझी सेलिब्रेशनची नवी पद्धत आहे,' असे सिराजने सांगितले. कार्तिक झाला होता नाराज नॉटिंघम टेस्टमध्ये सिराजच्या कृतीवर टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) नाराजी व्यक्त केली होती.भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये सिराजनं जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) आऊट केल्यानंतर गप्प बसण्याचा इशारा केला होता. सिराजची ही कृती अनावाश्यक असल्याचं मत कार्तिकनं व्यक्त केले होते. भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजच्या दरम्यान कार्तिक सध्या कॉमेंट्री करत आहे. IND vs ENG : 15 ऑगस्टच्या दिवशी लॉर्ड्सवर लढाई, ब्रिटीशांचा बदला घेण्याची टीम इंडियाला संधी दिनेश कार्तिकनं 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्रात लिहलेल्या लेखात या विषयावरील मत व्यक्त केलं आहे. 'माझ्या मते सिराजनं विकेट घेतल्यानंतर बॅट्समनला गप्प बसण्याचा केलेला इशारा अनावश्यक होता. त्याची विकेट घेतल्यानंतर हे करण्याची काय गरज होती? सिराजला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये मिळालेला हा पहिला धडा आहे. आपल्या उत्साही सहकाऱ्याला शांत करण्यासाठी विराट कोहलीला पुढं यावं लागेल याचा विचार किती जणांनी केला होता? पण सिराज मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी विराटला घ्यावी लागली.' असं मत कार्तिकनं या लेखात व्यक्त केले. आता सिराजनं तिसऱ्या दिवसाच्या नंतर दिलेल्या उत्तरामध्ये कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्याचा इशारा कार्तिककडंच असल्याचे मानले जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, India vs england

  पुढील बातम्या