Home /News /sport /

IND vs ENG: बुमराहला जखमी करण्याचा प्रयत्न करणारा बॉलर तिसऱ्या टेस्टमधून आऊट

IND vs ENG: बुमराहला जखमी करण्याचा प्रयत्न करणारा बॉलर तिसऱ्या टेस्टमधून आऊट

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England Third Test) बुधवारपासून सुरू होणार आहे. या टेस्टपूर्वी इंग्लंडला आणखी एक धक्का बसला आहे.

    हेडिंग्ले, 23 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England Third Test) बुधवारपासून सुरू होणार आहे. या टेस्टपूर्वी इंग्लंडला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचे जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोन प्रमुख फास्ट बॉलर दुखापतीमुळे यापूर्वीच या सीरिजमधून आऊट झाले आहेत. तसंच बेन स्टोक्सनंही मानसिक कारणामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.  त्यानंतर आणखी एक खेळाडू तिसरी टेस्ट खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वूड (Mark Wood) दुखापतीमुळे तिसऱ्या टेस्टमधून आऊट झाला आहे.  त्याला लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी दुखापत झाली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी तो सुरुवातीला मैदानावर आला नव्हता. त्यानंतर बॉलिंगला येताच त्यानं बाऊन्सर टाकून जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बुमराह आणि त्याचा वादही झाला होता. मात्र आता मार्क वूडच दुखापतीमुळे टीममधून आऊट झाला आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने टीममध्ये मोठे बदल केले आहेत. क क्रऊले, डॉम सिब्ली आणि जॅक लीच या तिघांना टीममधून वगळण्यात आले आहे. तर डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि फास्ट बॉलर साकिब महमूदचा (Saqib Mahmood) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मार्क वूड जखमी असूनही त्याची टीममध्ये निवड करण्यात आली होती. मात्र आता तो बाहेर पडल्यानं इंग्लंडला नव्यानं विचार करावा लागेल. मार्क वूडच्या जागी साकिब महमूद लीड्समध्ये खेळण्याची शक्यता आहे. मोठी बातमी: टीम इंडियाच्या कोचपदासाठी शास्त्रीच्या शिष्याचं नाव आघाडीवर  साकीब महमूदचा स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाल्यानंतर कव्हर म्हणून टीममध्ये समावेश केला होता. महमूदनं आजवर एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही. पाकिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत त्याने 9 विकेट्स घेतल्या होत्या. तर मलान यापूर्वी 15 टेस्ट खेळला आहे. यामध्ये त्याने 27.84 च्या सरासरीनं 724 रन काढले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या