मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : राहुलनं 31 वर्षांनंतर केला पराक्रम, लॉर्ड्सवर पहिल्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा

IND vs ENG : राहुलनं 31 वर्षांनंतर केला पराक्रम, लॉर्ड्सवर पहिल्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा

केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England, Lord's Test) वर्चस्व गाजवलं आहे

केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England, Lord's Test) वर्चस्व गाजवलं आहे

केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England, Lord's Test) वर्चस्व गाजवलं आहे

  • Published by:  News18 Desk

लॉर्ड्स, 12 ऑगस्ट : केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs England, Lord's Test) वर्चस्व गाजवलं आहे. राहुलनं आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि नंतर कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासोबत केलेल्या भागिदारीमुळे टीम इंडियानं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 276 रन केले आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा राहुल 127 आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 1 रन काढून नाबाद होता.

पाच टेस्टच्या मालिकेतील पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली. त्यानंतर लॉर्ड्स टेस्टमध्येही सुरुवातीला पावसाचा अडथळा आला. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल (KL Rahul) या ओपनिंग जोडीनं सावध सुरुवात केली. त्यांनी जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सनचा स्पेल सावधपणे खेळून काढला.

मैदानात सेट झाल्यानंतर रोहितनं खराब बॉलचा समाचार घेत रन जमवले. सॅम करनला त्यानं विशेष लक्ष्य केले. त्याच्या 10 बॉलमध्येच रोहितनं 5 फोर लगावले. रोहितनं त्याचं अर्धशतक 83 बॉलमध्ये पूर्ण केले. त्यानंतरही रोहितचा ओघ सुरु होता. त्यानं राहुलच्या मदतीनं पहिल्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप केली.

नॉटिंघम टेस्टमध्ये या जोडीनं 97 रनची भागिदारी केली होती. या जोडीनं लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 126 रनची पार्टनरशिप करत टीम इंडियाला भक्कम सुरुवात करुन दिली. रोहित शर्माची शतकाच्या दिशेनं सुरु असलेली वाटचाल जेम्स अँडरसननं रोखली. रोहित 83 रन काढून आऊट झाला.चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) खराब फॉर्म लॉर्ड्समध्येही सुरु आहे. पुजारानं फक्त 9 रन काढले. पुजारा आऊट झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीनं चांगली पार्टनरशिप केली.

राहुलचा 31 वर्षांनतर पराक्रम

केएल राहुलनं टेस्ट कारकिर्दीमधील सहावं आणि लॉर्ड्सवरील पहिलं शतक 212 बॉलमध्ये पूर्ण केलं. राहुल लॉर्ड्सवर शतक बनवणारा रवी शास्त्री यांच्यानंतरचा पहिलाचा भारतीय ओपनर बनला आहे. शास्त्रींनी 1990 साली लॉर्ड्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर 31 वर्षांनी राहुलनं हा विक्रम केला आहे.

IND vs ENG : केएल राहुलचं दमदार शतक, लॉर्ड्स टेस्टवर टीम इंडियाचं वर्चस्व

राहुल आणि विराट कोहली जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 117 रनची भागिदारी केली. ओली रॉबिन्सननं विराट कोहलीला 42 रनवर आऊट करत ही जोडी फोडली. विराट आऊट झाल्यानंतर राहुल आणि अजिंक्य राहाणेनं अधिक पडझड होऊ न देता उर्वरित खेळ खेळून काढला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 2 विकेट्स घेतल्या. तर ओली रॉबिन्सननं एक विकेट घेतली.

First published:

Tags: Cricket, India vs england