मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: इंग्लंडसाठी धक्कादायक बातमी, आक्रमक खेळाडू माघार घेण्याच्या तयारीत

IND vs ENG: इंग्लंडसाठी धक्कादायक बातमी, आक्रमक खेळाडू माघार घेण्याच्या तयारीत

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये यजमान टीमच्या अडचणी वाढत आहेत. या सीरिजमधील काही टेस्ट न खेळण्याचे संकेत इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूनं दिले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये यजमान टीमच्या अडचणी वाढत आहेत. जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स या खेळाडूंनी यापूर्वीच या सीरिजमधून माघार घेतली आहे. त्यांच्या अनुपस्थितीची फटका सहन करणाऱ्या इंग्लंड टीमची डोकेदुखी आगामी काळात आणखी वाढणार आहे. टीमचा विकेट किपर जोस बटलरनं (Jos Buttler) या सीरिजमधील काही टेस्ट मॅच न खेळण्याचे संकेत दिले आहेत. पाच टेस्टच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 नं आघाडीवर आहे. आता तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे.

काय आहे कारण?

जॉस बटलरची पत्नी लुईस दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे बटलरनं आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. तो याच कारणामुळे भारताविरुद्धच्या काही टेस्ट तसंच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अ‍ॅशेस सीरिजमधून माघार घेण्याच्या विचारात आहे. बटलरनंच ही माहिती दिली आहे.

इंग्लंडची टीममधील खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी यूएईमध्ये आयपीएल स्पर्धा आणि टी20 वर्ल्ड कप खेळणार आहेत. त्यामुळे ते 4 महिने कुटुंबापासून दूर असतील. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी क्रिकेटसाठी खूप काही सहन केलं आहे, असं सांगत बटलरनं अ‍ॅशेस सीरिजमधील सहभाग अनिश्चित असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'कोरोनामुळे सर्वांच्याच अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया अत्यंत कठोरपणे कोरोनाच्या आव्हानांचा सामना करत आहे. बायो-बबलमध्ये दीर्घ काळ राहणे ही एक समस्या आहे. आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अधिक माहिती मिळत नाही, तोपर्यंत यावर काही बोलणे अशक्य आहे,' अशी प्रतिक्रिया त्यानं एका ब्रिटीश वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

जेसन होल्डर बनला थर्ड अंपायर, आपल्याच खेळाडूला दिलं OUT, पाहा VIDEO

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुटुंबीयांना घेऊन जाण्याची मागणी केली आहे. याबाबत यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार  इंग्लंडच्या सीनिअर खेळाडूंनी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) त्यांची अट मान्य केली नाही तर दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) याबाबत ऑस्ट्रेलियन बोर्डाला इशारा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.  भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या कुटुंबासह आली आहे, याकडेही या खेळाडूंनी लक्ष वेधलं आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england