मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : बुमराहनं टाकले 1, 2 नाही तर तब्बल 13 नो बॉल! शेवटच्या ओव्हरमध्ये तर हद्द झाली...

IND vs ENG : बुमराहनं टाकले 1, 2 नाही तर तब्बल 13 नो बॉल! शेवटच्या ओव्हरमध्ये तर हद्द झाली...

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये तो सपशेल अपयशी ठरला. या इनिंगमध्ये त्यानं तब्बल 13 नो बॉल टाकले.

  लॉर्डस, 15 ऑगस्ट : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) नॉटिंघम टेस्टमध्ये 9 विकेट्स घेत जोरदार सुरुवात केली होती. त्यानंतर लॉर्ड्स टेस्टमधील (India vs England 2nd Test) पहिल्या इनिंगमध्ये तो सपशेल अपयशी ठरला. त्यानं या इनिंगमध्ये 79 रन दिले, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याहूनही काळजीची गोष्ट म्हणजे बुमराहनं या इनिंगमध्ये तब्बल 13 नो बॉलची खैरात वाटली. 15 मिनिटांची ओव्हर इंग्लंडच्या इनिंगमधील 126 वी ओव्हर बुमराहनं तब्बल 15 मिनिटं टाकली. या ओव्हरमधील पहिला बॉल जेम्स अँडरसनच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर कनकशन नियमानुसार अँडरसनची तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 मिनिटे वाया गेली. त्यानंतर बुमराहनं त्या ओव्हरमध्ये तब्बल 4 नो बॉल टाकले. जसप्रीत बुमराहवर या खराब बॉलिंगमुळे क्रिकेट फॅन्सनी टीका केली आहे. नो बॉल टाकण्याची ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा असती तर त्यात त्याला मेडल मिळेल अशी टीका क्रिकेट फॅन्सनी केली आहे. IND vs ENG : टीम इंडियात दाखल झाले 2 नवे खेळाडू, 'खास' कारणामुळे झालं आगमन चूक महाग पडणार? जसप्रीत बुमराहनं 13 नो बॉल टाकले. हा दोन ओव्हर्सपेक्षा जास्त कालावधी आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ओव्हर रेट कमी झाला तर नियमाप्रमाणे त्यांच्या पॉईंट्समध्ये कपात होऊ शकते. नॉटिंघम टेस्टनंतर स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीनं भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमच्या खेळाडूंना आर्थिक दंड लावला होता. तसंच त्यांच्या 2 पॉईंट्सची कपात केली होती. आता बुमरहाच्या नो बॉलमुळे देखील टीम इंडियाच्या काळजीत भर पडली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, India vs england, Jasprit bumrah

  पुढील बातम्या