मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : ...म्हणून टीम इंडिया सीरिज जिंकणार! स्टुअर्ट ब्रॉडचा मोठा दावा

IND vs ENG : ...म्हणून टीम इंडिया सीरिज जिंकणार! स्टुअर्ट ब्रॉडचा मोठा दावा

इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीमुळे (Stuart Broad Injury) भारताविरुद्धच्या सीरिजमधून आऊट झाला आहे. या सीरिजमधून बाहेर पडताच त्यानं इंग्लंडच्या टीमला धोक्याचा इशारा दिला आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 ऑगस्ट : इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीमुळे (Stuart Broad Injury) भारताविरुद्धच्या सीरिजमधून आऊट झाला आहे. या सीरिजमधून बाहेर पडताच त्यानं इंग्लंडच्या टीमला धोक्याचा इशारा दिला आहे. भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जखमी होणारा मी शेवटचा खेळाडू नसेल. इंग्लंडचे आणखी काही बॉलर देखील या सीरिजमध्ये दुखापतग्रस्त होतील, अशी भीती ब्रॉडनं व्यक्त केली आहे. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमुळे इंग्लिश बॉलर्सना टेस्ट सीरिजची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळे हे होत असल्याचं ब्रॉडनं सांगितलं.

इंग्लंडचे अनेक खेळाडू 'द हंड्रेड' आणि टी 20 सीरिज खेळून टेस्ट टीममध्ये दाखल झाले आहेत. ब्रॉडनं 'डेली मेल'मध्ये लिहलेल्या कॉलममध्ये या विषयाकडं लक्ष वेधलं आहे. 2021 मध्ये बॉलर्सनी लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट जास्त खेळलं आहे. त्यामुळे त्याना टेस्ट सीरिजसाठी तयारी करता आली नाही. त्यांना याचा फटका बसू शकतो. साकिब महमूदचा (Saqib Mahmood) भारताविरुद्धच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पण त्यानं मागील दोन महिन्यात रेड बॉल क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळे त्याला कोणत्याही तयारीशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये उतरवणं अवघड आहे.' असं ब्रॉडनं स्पष्ट केलं.

सर्व बॉलर्सना धोका

इंग्लंडचे सर्व बॉलर्स दुखापतीच्या रेड झोनमध्ये असल्याचा दावा ब्रॉडनं केला आहे. 'सॅम करन द हंड्रेडमध्ये 5 बॉल टाकत होता. आता त्याच्याकडून दिवसभरात 20 ते 25 ओव्हर्स टाकण्याची अपेक्षा केली जात आहे. टीममध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ख्रिस वोक्स (Chris Woakes) सारख्या खेळाडूंसाठी तर परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.'

स्वातंत्र्यदिनी नीरज चोप्रानं जिंकलं मन, गोल्डन बॉयची कृती वाचून वाटेल अभिमान!

जेम्स अँडरसनही अनफिट!

इंग्लंड बॉलर्सना दुखापतीचा धोका आहे, या ब्रॉडच्या दाव्याला आधार आहे. लॉर्ड्स टेस्टच्यापूर्वी जेम्स अँडरसन देखील पूर्ण फिट नसल्याची बातमी होती. त्यानंतरही तो लॉर्ड्स टेस्ट खेळतोय. जोफ्रा आर्चरनं यापूर्वीच दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे. तो आता कदाचित पुढील वर्षीच क्रिकेटच्या मैदानात दिसेल. त्याचबरोबर बेन स्टोक्सनंही मानसिक कारण देत या टेस्ट सीरिजमधून माघार घेतली आहे. या यादीत आणखी भर पडल्यास इंग्लंडची डोकेदुखी वाढणार आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england