मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडचा 'तो' प्लॅन उघड

IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडचा 'तो' प्लॅन उघड

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिली टेस्ट बुधवारपासून सुरू होणार आहे. . टीम इंडियाला टेस्ट जिंकू न देण्यासाठी यजमान इंग्लंड टीमनं तयार केलेला प्लॅन आता उघड झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिली टेस्ट बुधवारपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) झालेल्या पराभवानंतर टीम इंडियात पहिल्यांदाच टेस्ट खेळणार आहे. नॉटिंगहॅममध्ये होणारी ही टेस्ट जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा भारतीय क्रिकेट टीमचा प्रयत्न असेल. टीम इंडियाला टेस्ट जिंकू न देण्यासाठी यजमान इंग्लंड टीमनं तयार केलेला प्लॅन आता उघड झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) नॉटिंगहॅममधील पिचचा एक फोटो शेअर केलाय, बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर केलाय. तो फोटो पाहून भारतीय फॅन्सची काळजी वाढली आहे. याचं कारण म्हणजे या पिचवर भरपूर गवत आहे. त्यामुळे या पिचवर भारतीय बॅट्समनची चांगलीच कसोटी लागणार आहे. इंग्लंडमधील थंड वातावरण आणि उसळत्या ड्यूक्स बॉलर भारतीय बॅटींग ऑर्डर अनेकदा कोसळली आहे. त्यामुळे नॉटिंगहॅम टेस्टमध्येही हीच अवस्था राहिली तर टीम इंडिया अडचणीत येऊ शकते. इंग्लंडची बदला घेण्याची तयारी इंग्लंडची टीम फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी भारतामधील स्पिन बॉर्लसना मदत देणाऱ्या पिचवर ब्रिटीश बॅटींगची वाताहत झाली होती. भारताने स्पिन बॉलर्सच्या जोरावर ती मालिका 3-1 नं जिंकली. आता इंग्लंडची टीम या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंडकडं जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे अनुभवी बॉलर्स आहेत. हे बॉलर विराट कोहलीच्या टीमची डोकेदुखी ठरु शकतात. Tokyo Olympics : अनू मलिकवर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप! वाचा काय आहे प्रकरण विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला इंग्लंडमध्ये एकही टेस्ट मालिका जिंकता आलेली नाही. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट सीरिजला (2021-23) देखील सुरुवात होत आहे. त्यामुळे ही मालिका जिंकून नव्या सीरिजची जोरदार सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
First published:

Tags: Cricket, India vs england

पुढील बातम्या