मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची टीम इंडियाला संधी, इंग्लंडचं टेन्शन वाढलं!

IND vs ENG : लॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची टीम इंडियाला संधी, इंग्लंडचं टेन्शन वाढलं!

भारतीय बॉलर्सपुढे दोन आव्हानं

भारतीय बॉलर्सपुढे दोन आव्हानं

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs England 2 nd Test) सध्य रंगतदार अवस्थेत आहे. ही टेस्ट जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी टीम इंडियाला आहे.

लॉर्ड्स, 16 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs England 2 nd Test) सध्य रंगतदार अवस्थेत आहे. चौथ्या दिवसाच्या शेवटी टीम इंडियानं 6 आऊट 181 रन केले आहेत. भारताकडे आणखी 4 विकेट्स शिल्लक आहेत. ही आघाडी जास्तीत जास्त वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या मालिकेतील पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. आता दुसरी टेस्ट जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी टीम इंडियाला आहे.

इंग्लंडचं टेन्शन वाढलं

कोणत्याही टेस्टमध्ये चौथ्या इनिंगमध्ये बॅटींग करणे हे आव्हानात्मक असते. इंग्लंडचा टीम इंडियाविरुद्धचा रेकॉर्ड आणखी खराब आहे. दोन देशांमधील मागच्या ज्या तीन टेस्टमध्ये चौथी इनिंग झाली. त्यापैकी 2 इनिंगमध्ये इंग्लंडला 165 रन देखील करता आले नाहीत. फेब्रुवारीत चेन्नईमध्ये झालेल्या टेस्टमध्ये इंग्लंडला चौथ्या इनिंगमध्ये 164 रनच करता आले होते. यापूर्वी 2016 साली विशाखापट्टणम टेस्टमध्ये इंग्लंडला चौथ्या इनिंगमध्ये 158 रनच करता आले होते.

लॉर्ड्सवर इंग्लंडचा रेकॉर्ड भारताविरुद्ध चांगला आहे. या मैदानात इंग्लंडची टीम 6 पैकी फक्त 1 वेळा भारताविरुद्ध चौथ्या इनिंगमध्ये ऑल आऊट झाली आहे. 2014 साली इंग्लंडची टीम 223 रनवर संपुष्टात आली होती. त्यामुळे टीम इंडियानं ती टेस्ट 95 रननं  जिंकली होती. अन्य सर्व इनिंगमध्ये इंग्लंडनं लक्ष्य पूर्ण केले आहे. मात्र त्या काळात सर्वात मोठे लक्ष्य 108 होते. त्यामुळे टीम इंडियानं चौथ्या इनिंगमध्ये 200 रनची आघाडी घेतल्यास इंग्लंडच्या अडचणीत वाढू शकतात.

WI vs PAK : श्वास रोखून धरणाऱ्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर थरारक विजय

इंग्लंडचा ऑफ स्पिनर मोईन अलीनं दुसऱ्या इनिंगमध्ये आत्तापर्यंत 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं चौथ्या दिवसाच्या शेवटी अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत. त्याला पिचची मदत मिळत आहे. आता पाचव्या दिवशी रविंद्र जडेजाला या पिचचा फायदा उठवण्याची संधी आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england