मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: लॉर्ड्समधील पराभवानंतर इंग्लंडची धावाधाव, नंबर 1 बॅट्समनचा टीममध्ये समावेश

IND vs ENG: लॉर्ड्समधील पराभवानंतर इंग्लंडची धावाधाव, नंबर 1 बॅट्समनचा टीममध्ये समावेश

लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England, Lords Test) टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने टीममध्ये मोठे बदल केले आहेत. 25 ऑगस्टपासून लीड्सवर सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्टपूर्वी (India vs England, 3rd Test) 3 खेळाडूंना वगळण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 19 ऑगस्ट: लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England, Lords Test) टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने टीममध्ये मोठे बदल केले आहेत. 25 ऑगस्टपासून लीड्सवर सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्टपूर्वी (India vs England, 3rd Test) 3 खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. झॅक क्रऊले, डॉम सिब्ली आणि जॅक लीच या तिघांना टीममधून वगळण्यात आले आहे. तर डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि फास्ट बॉलर साकिब महमूदचा (Saqib Mahmood) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. फास्ट बॉलर मार्क वूड जखमी असूनही त्याची टीममधील जागा कायम आहे.

डॉम सिब्ली लॉर्ड्स टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये फ्लॉप ठरला होता. त्याने 2 टेस्टमध्ये 14.25 च्या सरासरीनं फक्त 57 रन बनवले होते. तर झॅक क्राऊलेला पहिल्या टेस्टमधील खराब कामगिरीनंतर टीममधून वगळण्यात आले होते. तर स्पिनर जॅक लीचला या मालिकेत एकही संधी न देता वगळण्यात आलं आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये 151 रननं झालेल्या पराभवानंतर इंग्लंड टीममध्ये मोठे बदल होणार हे निश्चित होते.

नंबर 1 बॅट्समनचा समावेश

लीड्स टेस्टसाठी समावेश झालेला डेव्हिड मलान टी20 क्रिकेटमध्ये नंबर 1 बॅट्समन असून तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. तर साकीब महमूदचा स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाल्यानंतर कव्हर म्हणून टीममध्ये समावेश केला होता. महमूदनं आजवर एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही. पाकिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत त्याने 9 विकेट्स घेतल्या होत्या. तर मलान यापूर्वी 15 टेस्ट खेळला आहे. यामध्ये त्याने 27.84 च्या सरासरीनं 724 रन काढले आहेत.

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर, IPL मधील करोडपतीला जागा नाही

इंग्लंडची टीम : जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रेग ओवरटन, ओली पोप, ओली रॉबिनसन आणि मार्क वूड

First published:

Tags: Cricket news, India vs england