• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • टीम इंडियाला कोरोनाचा धोका वाढला! ऋषभ पंतनंतर 'हा' सदस्यही पॉझिटिव्ह

टीम इंडियाला कोरोनाचा धोका वाढला! ऋषभ पंतनंतर 'हा' सदस्यही पॉझिटिव्ह

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (Team India) कोरोनाचा (coronaviris) धोका वाढत आहे. विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंत (Rishbah Pant) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

 • Share this:
  लंडन, 15 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (Team India) कोरोनाचा (coronavirus) धोका वाढत आहे. विकेट किपर - बॅट्समन ऋषभ पंत (Rishbah Pant) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एका सदस्याला करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या टेस्टपूर्वी 20 दिवसांच्या ब्रेकनंतर बुधवारीच खेळाडू बायो-बबलमध्ये डरहॅम इथं एकत्र आले आहेत. टीम इंडियातील सपोर्ट स्टाफ थ्रोडाउन विशेषज्ञ दयानंद जारानी (Dayanand Garani) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक रिद्धिमान सहा हा सुदधा विलगीकरणात गेला आहे. त्याचबरोबर कोचिंग स्टाफमधील आणखी तीन जणांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हे चारही जण टीम इंडियासोबत डरहमला दाखल झाले नसल्याची माहिती आहे. यापूर्वी ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. पंत हा टीम इंडियातील महत्त्वाचा सदस्य आहे. तो सुट्टीच्या दौऱ्यानं युरो कप स्पर्धेतील  (Euro Cup 2021) मॅच पाहण्यासाठी देखील गेला होता. इंग्लंड विरुद्ध जर्मनी (England vs Germany) हा सामना पंतनं प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये पाहिला होता. IND vs ENG : टीम इंडियाच्या कामगिरीवर कोच नाराज, मोठ्या बदलाचा दिला इशारा इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा-3 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. इंग्लंड टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली, ज्यामुळे इंग्लंडला पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी संपूर्ण टीमच बदलावी लागली. पाकिस्तानची सीरिज सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच हा प्रकार घडला होता. त्यामुळे टीम इंडियाने अधिक खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र तरीही भारतीय खेळाडूंनी गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त मास्कचा वापर न करता फिरत होते. या निष्काळजीपणाचा फटका टीम इंडियाला बसला असल्याचं मानलं जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: